Home » झोपडीत राहणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या तरूणाने दिलाय ‘रॉकीभाईला’ आवाज…!
Celebrities

झोपडीत राहणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या तरूणाने दिलाय ‘रॉकीभाईला’ आवाज…!

अनेक चित्रपटांच्या यशाचे श्रेय हे या चित्रपटातील नायक नायिकांप्रमाणे या चित्रपटांतील संवाद व  संवादफेकीला जाते. लोकप्रिय चित्रपटातील संवाद मधील संवादासाठी वापरला गेलेला आवाज म्हणजे डबिंग हे यामध्ये महत्त्वपूर्ण मानले जाते.दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट सध्या लोकप्रिय होत आहेत. या चित्रपटां मधील संवाद चाहत्यांच्या लक्षात राहत आहे.

विशेष म्हणजे हे संवाद या चित्रपटातील नायकांनी स्वतः डब केलेले नसून अन्य एखाद्या डबिंग आर्टिस्टने केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचे संवाद सुद्धा खूप गाजले. अल्लू अर्जुनच्या या  चित्रपटासाठी हिंदी आवृत्तीला आवाज मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ने दिला होता. यानंतर पुन्हा एकदा एका दाक्षिणात्य चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे व दिवसेंदिवस या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढत आहे.

हा चित्रपट म्हणजे केजीएफ चाप्टर टू होय.या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता यशची  प्रमुख भूमिका असून संजय दत्त व रविना टंडन यांच्याही या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. या चित्रपटातील यशच्या  तोंडात असलेले संवाद चांगलेच गाजले आहेत.

या चित्रपटासाठी आवाज दिला आहे सचिन गोळे या मराठमोळ्या तरूणाने. सचिन हा एक व्यावसायिक डबिंग आर्टिस्ट आहे.या उंचीवर पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केला आहे.सचिन ला सुरुवातीच्या काळात एक अभिनेता बनायचे होते मात्र घरातील आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही मात्र तो हिंमत मारला नाही व तो डबिंगची कामे करू लागला.सर्वात प्रथम त्याने धनुष च्या एका चित्रपटाला डबिंग केले होते.

या चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता इतकी वाढली की अनेक आघाडीच्या चित्रपटांना त्याने आत्तापर्यंत डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले .सचिनने के जीएफ चाप्टर टू या चित्रपटासाठी आवाज देत यशच्या भूमिकेला आवाज देऊन अधिक अविस्मरणीय ठरवले आहे याची दखल खुद्द यशने सुद्धा घेतली आहे.

About the author

Being Maharashtrian