Home » ‘समांतर-२’ मधील स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड सिन घालतोय सगळीकडे धुमाकूळ…
Celebrities

‘समांतर-२’ मधील स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड सिन घालतोय सगळीकडे धुमाकूळ…

मराठी चित्रपटात इंटिमेट सिन,किसींग सिन असणे हे काही नवीन नाही परंतु तरीही हिंदी सिनेमाच्या तुलनेत मराठी चित्रपटात असे सिन फार कमी असतात.वेबसिरिज च्या प्लॅट फॉर्मवर अशा सीनला बंधने नसतात असे असले तरीही मराठी सिरीज मध्ये असे सिन कमी प्रमाणातच बघायला मिळतात.

परंतु आता नुकत्याच रिलीज झालेल्या समांतर-२ मध्ये वेब सिरीजमधील एक सिन सध्या खूप चर्चेत आहे.या वेबसीरिज मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित मुख्य पती पत्नीच्या भूमिकेत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या ‘समांतर’ हि वेबसिरीज खूप गाजली होती.आता ‘सामंतर-२’ या वेबसिरिजची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.अखेरकार समांतर-२ ही ‘मोस्ट अवेटेड’ वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.या वेबसिरिजच्या पहिल्या सीजनमधील ड्रामा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे.मात्र आता दुसरे  सीजन रिलीज होताच,समोर आलेला स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यातील बोल्ड सीन चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

३० जुनला समांतरचा दुसरा सीजन रिलीज झाला आहे.यावेळी तेजस्विनीने या सीजनमधील एक इनसाईड सीनचा फोटो शेअर करत प्रेक्षकांचे लक्षवेधून घेतले आहे.ज्यामध्ये स्वप्नील आणि तेजस्विनी यांचा इंटीमेट सीन दिसत आहे.हा सीन व्हायरल होताच हिंदी वेबसिरीज सारखा आता मराठी वेबसिरिजला देखील बोल्ड अँगल देण्यात आल्याची सगळीकडे चर्चा होत आहे. 

एका वर्षाअगोदर समांतरचा पहिला भाग रिलीज झाला होता त्यानंतर चाहत्यांनी वर्षभर या वेबसिरिजचे दुसरे सीजन केव्हा येणार आहे ? हा प्रश्न विविध माध्यमातून स्वप्नीलला विचारायला सुरुवात केली होती.

सध्या सिनेमागृह शर्ट डाऊन असताना मोठा प्रमाणात प्रेक्षकवर्ग हा ओटीटी प्लॅटफॉर्म कडे वळला आहे आणि याचा फायदा सध्या रिलीज होणाऱ्या वेबसिरिजला होतोय.त्यामुळे नुकताच भेटीला आलेला ‘समांतर-२’ काय कमाल करतो हे पाहणे इंटरेस्टींग वाटेल.

About the author

Being Maharashtrian