Home » खाना खाया क्या बेटा? शाहरुखने विचारलेल्या प्रश्नावर आर्यन रडत रडत म्हणाला… 
Celebrities

खाना खाया क्या बेटा? शाहरुखने विचारलेल्या प्रश्नावर आर्यन रडत रडत म्हणाला… 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे पूर्ण कुटुंब सध्या खुप तणावाखाली आहे.अ’म’ली पदार्थाच्या प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला एक दिवस तुरुंगात घालवणे कठीण जात आहे.आर्यनला १४ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी वडील शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली.गुरुवारी सकाळी शाहरुख खानने आर्थर रोड जेलमध्ये जाऊन आपल्या मुलाचे धाडस वाढवले.वडील आणि मुलाची १५ मिनिटांची ही भेट अतिशय भावनिक होती.आर्यन खान त्याच्या वडिलांना पाहून रडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याआधी शाहरुख खान आणि गौरी खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाशी संवाद साधला होता.महाराष्ट्रातील को’रो’ना प्रोटोकॉलमुळे,कै’द्यां’ना कुटुंबातील सदस्यांना समोरासमोर भेटता येणार नाही,अशी मार्गदर्शक तत्त्वे होती. परंतु २१ ऑक्टोबर रोजी म्हणजेच गुरुवारी या मार्गदर्शक तत्वांमध्ये सवलत देण्यात आली.

तुरुंगात कैद्याला कसे भेटणार?

आतापासून आर्थर रोडवर,कुटुंबातील सदस्य,नातेवाईक आणि वकील तुरुंगात जाऊन कैद्यांना भेटू शकतात. नातेवाईक/वकील यांना आधी बैठकीसाठी तुरुंग अधिकाऱ्यांना कळवावे लागते यानंतर,भेटण्याची वेळ तुरुंग अधिकारी सांगतील.

कारागृहातील कैद्याला भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला आपले आधार कार्ड तुरुंग अधिकाऱ्याकडे सादर करावे लागेल.त्याचा तपशील नोंदवला जातो.नातेवाईक/वकील यांना टोकन दिले जाते.कैद्याला भेटण्यापूर्वी टोकन दाखवावे लागते.या सर्व प्रक्रियेनंतर कैद्याला भेटता येईल.

शाहरुख खान आपल्या मुलाला कसा भेटला?

तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मुलाला भेटताना शाहरुख खानला विशेष वागणूक देण्यात आली नव्हती.भेटीच्या वेळी आर्यन खान आणि शाहरुख यांच्यामध्ये एक ग्रिल आणि काचेची भिंत होती.हे को’रो’ना’मुळे केले गेले. शाहरुख आणि आर्यन इंटरकॉमवर बोलले.या दरम्यान २ रक्षक तेथे उपस्थित होते. 

आर्यन खान खूप दिवसांनी वडिलांना पाहून रडला.तो खूप भावनिक झाला होता.शाहरुख खानलाही आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहणे सोपे नव्हते.ते १५ मिनिटे शाहरुख-आर्यनसाठी खुप भावनिक होते.

आर्यन खानने त्याचे वडील शाहरुख खानला सांगितले की, त्याला तुरुंगाचे जेवण आवडत नाही.शाहरुख खानला मुलाची खूप काळजी वाटत होती.त्याला कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की घरी जेवण देण्यासाठी कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल.

आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझ शिपमधून पकडले. यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि तो एनसीबीच्या ताब्यात राहिला.एनसीबीची कोठडी संपल्यानंतर आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले.२ ऑक्टोबर रोजी जेव्हा आर्यन खान पकडला गेला,तेव्हा किंग खान परदेशात चित्रपटाचे शूटिंग करत होता.