Home » चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा,या साऊथ सुपरस्टारने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… 
Celebrities

चित्रपट सृष्टीत पसरली शोककळा,या साऊथ सुपरस्टारने वयाच्या ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… 

साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं निधन झालं आहे.छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.आता क्रिकेटर व्यंकटेश यांनी ट्विट करून त्यांचे नि’ध’न झाल्याची माहिती दिली.पुनीत राजकुमार अवघा ४६ वर्षांचा होता.त्यांनी दक्षिणेला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. याआधी,जिममध्ये वर्कआऊट करताना अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते.

पुनीत राजकुमार यांना २९ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुनीतची प्रकृती चिंताजनक असून सर्वतोपरी प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. आता रुग्णालयाकडून अधिकृत निवेदन समोर आले आहे. निवेदनानुसार,४६ वर्षीय पुनीत यांचे निधन झाले आहे.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४० वाजता छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवेदनात असेही म्हटले आहे की, पुनीत राजकुमारला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. तो हृदयविकाराच्या झटक्याने होता आणि डॉक्टरांनी लगेच त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला

पुनीत राजकुमारच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनावर बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. आर माधवन, महेश बाबू, सोनू सूद, कुबरा सैत, लक्ष्मी मंचू, अशोक पंडित, राम गोपाल वर्मा यांच्यासह इतर स्टार्सनी पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात असल्याचे सर्व स्टार्सचे म्हणणे आहे. 

बाल कलाकार ते सुपरस्टार असा प्रवास

पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती.१९८५ मध्ये पुनीत हे ‘बेट्टाडा होवू’  या चित्रपटात दिसले होते. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता, जिथे त्याचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. हा चित्रपट त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता.