Home » खिशात केवळ ३७ रूपये घेऊन मुंबईत आलेल्या अनुपम खेर यांचा संघर्ष आहे खूपच प्रेरणादायी…!
Celebrities Success

खिशात केवळ ३७ रूपये घेऊन मुंबईत आलेल्या अनुपम खेर यांचा संघर्ष आहे खूपच प्रेरणादायी…!

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नुकताच आपला 67 वा वाढदिवस साजरा केला आहे.अनुपम खेर यांनी आपल्या गेल्या अनेक वर्षांच्या अभिनय कारकीर्दीमध्ये विविध प्रकारच्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत.अनुपम खेर यांनी आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे व बॉलीवूड मधील अनेक सुपर स्टार सोबत सुद्धा त्यांनी अभिनय केला आहे.

अनुपम खेर यांनी विनोदी भूमिकांप्रमाणेच खलनायकाच्या भूमिकांमध्ये सुदधा रंग भरले आहे.अनुपम खेर यांची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.अभिनयासोबतच सोशल मीडियावर ही अनुपम खेर चांगलेच सक्रिय असतात व आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ते चाहत्यांसोबत शेअर करतात तसेच देशातील विविध घडामोडींवर ते अगदी न घाबरता व्यक्त होत असतात.अनुपम खेर हे निश्चितच बॉलीवूडचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.

अनुपम खेर यांचे व्यक्तिमत्व एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे.आतापर्यंतच्या त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे मात्र इथपर्यंतचा त्यांचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.अनुपम खेर यांना या संपूर्ण प्रवासात विविध प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागले मात्र बॉलीवूड मध्ये व घरातून बाहेर पडताना त्यांनी काही स्वप्न स्वतः जवळ बाळगली होती व यामुळेच ते यशस्वी होऊ शकले.

अनुपम खेर यांचे बालपण व सुरुवातीचे आयुष्य हिमाचल प्रदेशात गेले.बॉलीवूडच्या मोहमयी दुनियेपेक्षा त्यांचे आयुष्य खूपच वेगळे होते.मात्र आयुष्यात काहीतरी खूप मोठे भव्यदिव्य करण्याची त्यांची इच्छा होती व हे स्वप्न जवळ बाळगून ते मुंबई येथे दाखल झाले.मुंबईमध्ये येतांना त्यांच्याजवळ अवघे 37 रुपये होते.मुंबईत आल्यानंतर तीन वर्ष सलग त्यांनी संघर्ष केला.खिशामध्ये पैसे नव्हते त्यामुळे अनेक रात्री त्यांना फुटपाथवर किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मजवळ राहावे लागले.

इतक्या हलाखीच्या परिस्थितीत आपले नाव कमावण्याच्या स्वप्नामुळे त्यांनी परतीचा रस्ता धरला नाही.अनेकदा त्यांच्या वाट्याला नकार आले.कधी अभिनयामुळे त्यांची निवड झाली तेव्हा त्यांच्या लूकमुळे त्यांना नाकारले गेले मात्र त्यांनी हिंमत हारली नाही.यामुळेच आज त्यांचे नाव यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमध्ये गणले जाते.