Home » ‘या’ कारणामुळे दीपिकाला व्हायचे नाही रणवीरच्या मुलांची आई, सांगितलं ‘हे’ मोठं कारण…!
Celebrities

‘या’ कारणामुळे दीपिकाला व्हायचे नाही रणवीरच्या मुलांची आई, सांगितलं ‘हे’ मोठं कारण…!

बॉलिवूडमधील मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.दिपीका पदुकोनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगच्या दुनियेतून केली.दिपिका एक राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहे.अगदी पदार्पणातच दिपिकाला शाहरुख खान सोबत बिग बॅनर चित्रपट मिळाला.दीपिकाने आत्तापर्यंत बॉलीवूड मधील रोहित शेट्टी,संजय लीला भन्साळी,करण जोहर,सुजीत सरकार या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

दीपिका पदुकोण ला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये दीपिका सध्या वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहे.दिपिकाने दोन वर्षांपूर्वी अभिनेता रणवीर सिंह सोबत विवाह केला.रणवीर सिंह आणि दीपिका हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात.दोघे सुद्धा आपापल्या चित्रपटांमध्ये खूप उत्तम कामगिरी करत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर या दोघांचे अनेक छायाचित्रे व व्हिडिओ व्हायरल होत असतात.

या दोघांमधील प्रेम हे वेळोवेळी दिसून येते.सध्या दीपिका पादुकोण गर्भवती असल्याच्या बातम्या येत होत्या.यावरूनच दिपीकाला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला असता तिने सध्या आई होण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.कारण रणवीर आणि ती दोघेही पालक होण्यासाठी स्वतःला तयार झाले असे मानत नाहीत व म्हणूनच सध्या मूल होऊ देण्याचा त्यांचा विचार नसल्याचे तिने सांगितले.हे दोघेही आपल्या करिअरवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू इच्छितात.