Home » कौतुकास्पद ! सुपरस्टार यशने नाकारली कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर, कारण ऐकून थक्क व्हाल…!
Celebrities

कौतुकास्पद ! सुपरस्टार यशने नाकारली कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीची ऑफर, कारण ऐकून थक्क व्हाल…!

आजकाल स्पर्धेच्या युगामध्ये कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोचण्यासाठी व लोकांना आपले उत्पादन घेण्यास भाग‌ पाडण्यासाठी आकर्षक पद्धतीने जाहिरात करणे अविभाज्य बनले आहे. जाहिरातीमधील संदेशाप्रमाणे हा संदेश देणारा अभिनेता किंवा सेलिब्रिटी सुद्धा ती जाहिरात प्रभावित करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो म्हणूनच आजकाल अगदी छोट्या उत्पादनांसाठी मोठे मोठ्या सेलिब्रिटींना जाहिराती मध्ये घेतले जाते.

यासाठी त्यांना या जाहिरातींसाठी खूप मोठे मानधनही दिले जाते. अनेक सेलिब्रिटी एकाच वेळी विविध जाहिरातींमध्ये दिसून येतात. यावरून अनेकदा या सेलिब्रिटींनी वादाला तोंड फोडल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने विमल पान मसाला जाहिरातीमध्ये आपले दर्शन दिले होते. यानंतर चाहत्यांनी आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या उत्पादनाची जाहिरात केली म्हणून खूप मोठी टीका केली होती त्यामुळे अखेरीस अक्षयला माघार घ्यावी लागली.

याच प्रकारच्या जाहिराती दक्षिणेकडील अनेक स्टार्सनासुद्धा देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी या केवळ समाजामध्ये चुकीचा संदेश आहे  म्हणून नाकारल्या. या जाहिराती करण्यासाठी या स्टार्सना कोटींचे मानधन मिळणार होते मात्र समाजहिता पुढे त्यांनी कोट्यावधी रुपये नाकारले. के जीएफ चाप्टर टू या चित्रपटातील नायक यशला सुद्धा अशाच प्रकारे जाहिरात ऑफर करण्यात आली होती.

मात्र ही जाहिरात करण्यास यशने स्पष्टपणे नकार दिला. यशच्या सोशल मिडिया टीम ने यासंदर्भात असे सांगितले की यश नेहमी समाजाला योग्य संदेश देणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल अशी हमी आम्ही देतो व के जीएफ चाप्टर टू या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद हा नक्कीच सुखावह आहे असेही त्यांनी म्हटले आहे. याअगोदर पुष्पा चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन नेसुद्धा या जाहिरातीला नकार दिला होता.