Home » बॉलिवूड चित्रपट सृष्टीला शोककळा…विवाह चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन…
Celebrities

बॉलिवूड चित्रपट सृष्टीला शोककळा…विवाह चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन…

बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारणारे आणि अनेक टीव्ही शोमध्ये वडील आणि आजोबांची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसेन यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले.अभिनेत्याच्या नि’ध’नाची पुष्टी त्यांचे जावई दिग्दर्शक हंसल मेहता यांनी भावनिक चिठ्ठीद्वारे केली आहे. अभिनेत्याच्या नि’ध’ना’ची माहिती समोर येताच बॉलीवूड स्टार्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.अभिनेत्री पूजा भट्ट, अभिनेता अभिषेक बच्चन,मनोज बाजपेयी यांनी अभिनेत्याच्या नि’ध’ना’वर शोक व्यक्त केला आहे. 

युसूफ हुसेन यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केले आहे ते बघूया…

युसूफ हुसैन हे टीव्ही आणि चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली.यामध्ये ‘क्रेझी कुक्कड फॅमिली’, ‘रोड टू संगम’, ‘विवाह’, ‘धूम 2’, ‘रेड स्वस्तिक’, ‘एस्केप फ्रॉम तालिबान ‘, ‘ कुछ ना कहो’ या चित्रपटांचा समावेश आहे. 

त्याचबरोबर टीव्ही वरील ‘सीआयडी’, ‘कुमकुम’, ‘हर घर कुछ कहता है’ मालिकांमध्ये दिसले होते.त्यांनी टीव्ही शोमध्ये वडिलांची भूमिका साकारली आहे,युसूफ हुसेन शेवटची वेब सीरिज होस्टेसमध्ये डॉक्टर अलीच्या भूमिकेत दिसले होते.

अभिषेक बच्चनला काढली आठवण

अभिनेता अभिषेक बच्चनने पोस्टमध्ये ‘बॉब बिस्वास’ चित्रपटातील युसूफ हुसैनच्या आठवणीत घालवलेल्या क्षणांचा उल्लेख केला आहे.दु:ख व्यक्त करताना अभिषेकने लिहिले – #RIP युसूफ जी. ‘कुछ ना कहो’ पासून सुरुवात करून ‘बॉब बिस्वास’ पर्यंत आम्ही एकत्र काम केले. तूम्ही मला नेहमीच सौम्य,दयाळू आणि उबदार वाटलात. कुटुंबियांना सांत्वना.

पूजा भट्ट यांनी शोक व्यक्त केला

हंसल मेहता यांच्या भावनिक नोटवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री पूजा भट्टनेही तिचे दुःख शेअर केले आहे. ती लिहिते- हंसल, यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. तुम्हाला काय वाटत असेल याची कल्पना करणे कठीण आहे. सर्वांना माझ्या मनापासून संवेदना.पूजा-अभिषेक व्यतिरिक्त अभिनेता मनोज बाजपेयीनेही दु:ख व्यक्त केले आणि लिहिले – दु:खद बातमी! संपूर्ण कुटुंबाच्या संवेदना! आरआयपी युसूफ

हंसल मेहता यांची भावनिक पोस्ट

युसूफ हुसैन हे हंसल मेहता यांचे सासरे आहेत.त्यांची मुलगी सफिना हुसैन हिचे लग्न हंसल मेहता यांच्याशी झाले आहे. सासरा गमावल्यानंतर हंसल मेहता यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सासऱ्यासोबत घालवलेल्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. हंसल मेहता त्यांच्या सासऱ्याच्या अगदी जवळचे होते.