Home » चित्रपटाच्या ऑफर बंद झाल्यावर ‘या’ अभिनेत्री ने केले अरबपतीसोबत लग्न, आता जगत आहे असे आयुष्य
Celebrities Entertainment

चित्रपटाच्या ऑफर बंद झाल्यावर ‘या’ अभिनेत्री ने केले अरबपतीसोबत लग्न, आता जगत आहे असे आयुष्य

चित्रपट सृष्टी मध्ये एन्ट्री घेण्यासाठी चा अगदी सहज मार्ग म्हणजे सौंदर्य स्पर्धांचा किताब जिंकणे होय हे जणू समीकरणच बनले आहे. सौंदर्य स्पर्धांचा किताब जिंकल्यानंतर या सौंदर्यवती चित परिचित चेहरा बनून जातात व त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ची दारे आपोआपच खुली होतात मात्र या सर्व सौंदर्यवती आपल्या बॉलिवूडमधील करिअरला यशाच्या उंचीवर नेऊ शकत नाही. यापैकी काही अभिनेत्री या केवळ त्यांच्या सौंदर्य मुळेच ओळखल्या जातात व अभिनयाच्या बाबतीत त्या आपला जलवा दाखवू शकत नाहीत.काही सौंदर्यवती तर चित्रपटसृष्टीमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर वेळीच योग्य असा जोडीदार पाहून विवाह करुन संसाराला सुद्धा लागतात.

अशीच सौंदर्यवती म्हणजे माजी मिस इंडिया सेलिना जेटली होय. सेलिना जेटली आपल्या मोहक चेहरा, हॉट शरीरयष्टी आणि भुऱ्या डोळ्यांमुळे खूपच प्रसिद्ध होती .चित्रपट सृष्टी मध्ये येण्यापूर्वीच तिच्या नावाची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये होती. मात्र अभिनयाच्या बाबतीत फारसे अंग नसल्यामुळे सेलिना चित्रपट सृष्टी मध्ये फारसा जम बसवू शकली नाही.काही मोजक्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला. जानशीन हा तिचा पहिला चित्रपट फरदीन खान सोबत होता. या चित्रपटांमध्ये केवळ तिच्या सौंदर्याची दखल घेतली गेली .नुकताच तिने आपला एकोणचाळीसावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. या निमित्ताने सेलीना बाबतची काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

14 नोव्हेंबर 1981 साली सिमला येथे सेलिनाचा जन्म झाला. सेलीना चे वडील विके जेटली आणि आई मीता जेटली हे दोघे सुद्धा आर्मी मध्ये कार्यरत होते. सेलिना चे वडील हे आर्मी मध्ये कर्नल या पदावर होते .सेलीना चा भाऊ सुद्धा सध्या आर्मी मध्ये आपले योगदान देत आहे. सेलिना चे वडील लष्करामध्ये काम करत असल्यामुळे तिचे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले. सन 2001 साली तिने मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला व त्या वर्षीचा मिस इंडियाचा किताब सुद्धा तिने जिंकला. व यानंतरच खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये तिची एंट्री झाली.

सेलीनाने 2001 साली बाम्बे वाईकिंगच्या म्युझिक अल्बम मध्ये काम केले होते. त्यानंतर बॉम्बे वायकिंग च्या एका म्युझिक व्हिडिओ मध्ये सुद्धा ती झळकली होती. या दोन्ही म्युझिक व्हिडिओ  प्रेक्षकांनी खूपच पसंत केले. त्यानंतर 2003 साली फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेला जानशीन हा फरदीन खान सोबतचा चित्रपट सेलीना चा पहिलाच चित्रपट होता.

2011साली प्रदर्शित झालेला थँक्यू हा चित्रपट सेलिना ने अभिनय केलेला शेवटचा चित्रपट होता.

 2011साली सेलीनाने परदेशी व्यावसायिक पीटर होग यांच्या सोबत विवाह केला.सेलीना आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये खूपच समाधानी असून तिने तिच्या आणि पीटरच्या भेटीबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. दुबईमध्ये एका भारतीय फॅशन ब्रांच स्टोर चे उद्घाटन करण्यासाठी सेलिना गेली होती त्यावेळी सर्वात प्रथम तिची पीटर सोबत भेट झाली. यादरम्यान जणूकाही लव अट फर्स्ट साईट प्रमाणे ते दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. त्यानंतर पीटर सेलीना च्या आई वडिलांना भेटायला आले व या भेटीमध्ये त्याच दिवशी त्यांनी एकमेकांना अंगठ्या घालून वाड.निश्चयही केला.

विवाहानंतर परदेशातच स्थायिक झालेली सेलिना सध्या बॉलिवूडपासून पूर्णपणे दूर आहे. कोणत्याही चित्रपटांमध्ये किंवा मॉडेलिंगसाठी ती काम करत नाही. मात्र तरीही आपल्या श्रीमंत व्यावसायिक पतीसोबत अलिशान आयुष्य आरामात जगत आहे.2012 साली तिने जुळ्या मुलांना जन्म दिला .या दोन मुलांची नावे त्यांनी विराज आणि विन्स्टन ठेवली होती. आपल्या दोन्ही मुलांच्या पालनपोषणाचा मध्ये ती खूपच व्यस्त असते व सोशल मीडियावर तिचे आपल्या मुलांसोबत व कुटुंबात सोबतचे छायाचित्र नेहमीच व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा सेलीनाने जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र या मधील एक मुल दगावले. त्यामुळे सेलीना अतिशय दुःखात होती व या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती.