Home » ‘हा’ आहे दिशा पटानीचा आवडता अभिनेता, नाव ऐकून व्हाल चकित
Celebrities Entertainment

‘हा’ आहे दिशा पटानीचा आवडता अभिनेता, नाव ऐकून व्हाल चकित

दिशा पाटनी ही सध्याची बॉलीवूडमधील सर्वात हॉट आणि फिट अभिनेत्री म्हणून गणली जाते.खूप कमी काळामध्ये दिशाने आपल्या फॅन्सची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढवली आहे. खूप चाहते तिला सोशल मिडिया वर कायम फॉलो करत असतात .तिच्या लाइफस्टाइल बद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना खूपच उत्सुकता असते.  काही दिवसांपूर्वी दिशाने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत लाईव्ह सेशन केले .

यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.या सेशनमधून तिच्या आवडी निवडी बद्दल खूप माहिती मिळाली. तिच्या आवडत्या चित्रपटांविषयी विचारले असता एव्हेंजर हा तिचा आवडता चित्रपट आहे असे तिने सांगितले.याव्यतिरिक्त दिशाला एका चाहत्याने तिचा सर्वात जास्त आवडता अभिनेता कोण असे विचारले असता तिने क्षणाचाही वेळ न दवडता जाकी चान असे उत्तर दिले .टायगर श्रॉफ हा दिशाचा प्रियकर असून टायगर सुद्धा आपल्या फिट बॉडी मुळे आणि ऍक्शन पटां मुळे नेहमीच चर्चेत असतो. या पार्श्वभूमीवर दिशाने जॅकी चॅन चे नाव घेणे चाहत्यांना निश्चितच अचंबित करणारे होते.

दिशाला तिच्या प्रोफेशन विषयी एका चाहत्याने प्रश्न विचारला असता तुम्ही आपल्याला डिस्कवरी चैनल साठी काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर दिशा सध्या प्रभुदेवा निर्देशीत करत असलेल्या राधे या चित्रपटामध्ये झळकणार आहे व या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. सलमान खान हा सुद्धा राधे या चित्रपटाचा भाग आहे.