Home » ‘जॅकी चॅन’ चा मुलगा ही ड्र’ग्ज केस मध्ये पकडला गेला होता,त्यानंतर जॅकी चॅनने उचलले हे टोकाचे पाऊल… 
Entertainment

‘जॅकी चॅन’ चा मुलगा ही ड्र’ग्ज केस मध्ये पकडला गेला होता,त्यानंतर जॅकी चॅनने उचलले हे टोकाचे पाऊल… 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्र’ग्जचा वापर आणि खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपमधून आर्यनसह इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले.नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सांगितले की,त्यांना याबद्दल माहिती मिळाली होती की क्रूझ जहाजावर पार्टी होणार आहे.जेथे ड्र’ग्ज आणि अंमली पदार्थ वापरली जाऊ शकतात.ताब्यात घेतलेल्या लोकांच्या फोनवरून मिळालेल्या चॅट्सच्या आधारे आर्यनला अटक करण्यात आली.

त्यांना विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले,जिथून त्यांना एक दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आले.तर आर्यनचे वकील सतीश मानशिंदे म्हणतात की, आर्यनकडून कोणत्याही प्रकारचे ड्र’ग्ज सापडले नाहीत. एनसीबी केवळ चॅट्स आधारावर त्यांच्या क्लाइंटला गुंतवू शकत नाही.४ ऑक्टोबर रोजी आर्यनला न्यायालयात नेण्यात आले आहे,जिथे त्याच्या भविष्याचा निर्णय घेतला जाईल.

आर्यन खानच्या अटकेच्या बातमीनंतर शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग रद्द केले आहे.चित्रपटाच्या काही भागांच्या चित्रीकरणासाठी तो दीपिका पदुकोणसोबत स्पेनला जाणार होता पण जोपर्यंत आर्यन या अडचणीतून बाहेर येत नाही तोपर्यंत शाहरुख मुंबईतच राहाणार आहे.

मात्र,सुपरस्टारच्या मुलाला ड्र’ग्जच्या प्रकरणात पोलिसांनी अटक करण्याची ही पहिली वेळ नाही.जॅकी चॅन एक अतिशय लोकप्रिय चित्रपट अभिनेता आहे.२०१४ मध्ये,त्याचा मुलगा जेसी चॅनला ड्र’ग्जचा वापर आणि ज्यांनी त्याचा वापर केला त्यांना आश्रय दिल्याबद्दल अटक करण्यात आले होते.

१४ ऑगस्ट २०१४ रोजी जेसी चॅन ताइवानी चा चित्रपट अभिनेता काई को सोबत गां’जा वापरताना पकडला गेला.त्याला अटक केल्यानंतर त्याच्या बीजिंग घराची झडती घेण्यात आली.जिथून १०० ग्रॅम गां’जा जप्त करण्यात आला. अटकेनंतर १४ दिवसांनी काईची सुटका झाली.कारण त्याच्यावर फक्त औषध सेवन केल्याचा आरोप होता.पण जेसी चॅनला जास्त काळ शिक्षा होऊ शकली असती.कारण त्याच्यावर ड्र’ग्जच्या वापराबरोबरच त्याच्या घरी इतरांना ड्र’ग्स दिल्याचा आरोप होता.

तर २००९ मध्ये चिनी पोलिसांनी जॅकी चॅनला नारकोटिक्स कंट्रोल अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले.जॅकीने आपल्या मुलाला ड्र’ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर सार्वजनिक माफी मागितली.त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की तो आपल्या मुलाच्या या कृत्यामुळे अत्यंत रागावला,लाजला आणि निराश झाला आहे.

एका महिन्याच्या अटकेनंतर,जेसी चॅनला त्याच्या घरात दुसऱ्या ड्र’ग्ज वापरकर्त्याला जागा दिल्याबद्दल औपचारिकरित्या अटक करण्यात आली.सुमारे पाच महिने तुरुंगात घालवल्यानंतर ९ जानेवारी २०१५ रोजी या खटल्याची सुनावणी सुरू झाली.तिथून,जेसीला ६ महिने तुरुंगवास आणि २००० युआन दंडाची शिक्षा झाली.पण जेसीने शिक्षा होण्यापूर्वीच पाच महिने तुरुंगात घालवले होते.त्यामुळे १३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.अहवालांनुसार,जॅकी चॅन ना त्याच्या मुलाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात पोहोचला,ना त्याने शिक्षा कमी करण्यासाठी त्याच्या कनेक्शनचा वापर केला.

जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेसी चॅनने पत्रकार परिषद बोलावली.जिथे त्याने जाहीर माफी मागितली.जेसीने सांगितले की त्याने कायदा मोडला आणि तुरुंगात गेला.तो यासाठी कोणतीही सबब देणार नाही.त्याच वेळी,त्याने असेही म्हटले की त्याचे तुरुंगात जाणे हे त्याच्याबरोबर काम केलेल्या सर्वांना हानी पोहोचवेल.शेवटी,त्याने माध्यमांसमोर वचन दिले की तो आतापासून एका चांगल्या नागरिकाप्रमाणे जगेल.

असे म्हटले जाते की या घटनेनंतर काही काळानंतर,जेसी त्याचे वडील जॅकी चॅनला भेटला.पण दोघांचे नाते नेहमीच आंबट राहिले.२०११ मध्ये,एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान,जॅकी चॅनने घोषित केले की,माझ्या मृ’त्यू नंतर माझ्या संपत्तीचा अर्धा भाग एखाद्या चॅरिटेबल संस्थेला दान केला जाईल.म्हणजेच त्याची संपत्ती त्याच्या मुलाला दिली जाणार नाही.

जेकी चॅन त्याच्या मुलगा जेसी बद्दल बोलताना म्हणाले…

“जर माझ्या मुलामध्ये क्षमता असेल तर तो स्वतः पैसे कमवू शकेलं आणि नसेल तर तो माझे मेहनतीने कमवलेले पैसे वाया घालवेल.”