Home » ‘या’ अभिनेत्रीचा फोटो बघण्यासाठी होणारी तडफड बघून लावला गुगल इमेज सर्चचा शोध…!
Entertainment

‘या’ अभिनेत्रीचा फोटो बघण्यासाठी होणारी तडफड बघून लावला गुगल इमेज सर्चचा शोध…!

गरज ही शोधाची जननी आहे असे नेहमीच म्हटले जाते. आधुनिक युगात  विज्ञानावर आधारित अनेक शोध लागले व जीवन अधिक सुखकर झाले. प्रत्येक शोधामागे कोणती ना कोणती प्रेरणा नक्कीच असते. सध्या गुगल वर आपण कोणतीही गोष्ट सहजपणे सर्च करू शकतो. आपल्या घरात बसून जगभरातील माहिती आपण घेऊ शकतो, इमेजेस सर्च करू शकतो.

गुगल सर्च या ऑप्शन मध्ये कोणतेही चित्र आपल्यासमोर अगदी काही सेकंदांमध्ये येऊनही ठाकते. गुगल इमेज सर्च च्या शोधा मागे एका गायिका व अभिनेत्री असलेल्या ललनेचा खूप मोठा हात आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ होय. 1998 साली गुगल ची स्थापना झालीव 2001 सालच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याच्या वेळी जेनिफर लोपेझने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसने सगळीकडेच जलवा बिखरला.

जेनिफरच्या सर्व चाहत्यांना तीच्या या बोल्ड  लूकचे दर्शन घेण्यासाठी त्यावेळी गूगल वरती केवळ टेक्स्ट स्वरूपातील माहिती मिळत असे मग जेनिफर च्या बोल्ड लूकचे दर्शन करून घेण्यासाठी चाहत्यांना निरनिराळ्या स्वरूपातील टेक्स्ट टाईप करावे लागत असेल.

यावेळी गुगल ला वापरकर्त्यांना केवळ टेक्स्ट स्वरूपात माहिती नव्हे तर या पेक्षा अधिक असे काहीतरी हवे आहे हे समजले. इथे गुगल इमेज सर्चचा प्रवास सुरु झाला. गुगल इमेज सर्च शोधाची प्रेरणा ही निश्चितच जेनिफर लोपेझ होती हे गुगलचे सीईओ रिस्ट ही मान्य करतात. गुगल इमेज सर्चचा शोध  2001 साली लावला गेला.