Home » काय सांगता जेठालालच्या एका शर्टची किंमत आहे चक्क इतकी, एकूण व्हाल थक्क…!
Entertainment

काय सांगता जेठालालच्या एका शर्टची किंमत आहे चक्क इतकी, एकूण व्हाल थक्क…!

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमाने टेलिव्हिजन मधील लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले आहेत.हा कार्यक्रम गेली 13 वर्षे सर्वाधिक लोकप्रिय असलेला कार्यक्रम ठरला आहे.या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचे गमक हे या कार्यक्रमामधील पात्रांना जाते.या मालिकेतील सर्व पात्र हे प्रेक्षकांना आपल्या जवळचे वाटतात.मात्र त्यापैकी जेठालाल हे पात्र आज सुदधा एकपात्री प्रयोग प्रमाणे तारक मेहता का उल्टा चश्मा का शो टीआरपी मध्ये उच्च स्थानी राखण्यात यशस्वी ठरले आहे.

जेठालाल या पात्राचा अलग अंदाज व बोलण्याची लकब हे सर्व चाहत्यांना खूप भावते.जेठालाल चे अनेक चाहते आहेत.जेठालाल हे पात्र दिलीप जोशी या उत्कृष्ट अभिनेत्याने साकारलेले आहे.दिलीप जोशी यांनी आत्तापर्यंत अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र त्यांना खरी ओळख मिळवून दिली आहे ती जेठालाल या पात्राने.जेठालालच रोजच्या आयुष्यात होणारे प्रसंग जितके चाहत्यांच्या स्मरणात राहतात तितकेच लोकप्रिय जेठालाल घालत असलेले कपडे आहेत.

जेठालाल चे कपडे हे अनोख्या अंदाजात असतात.हे कपडे सुद्धा चाहत्यांना खूप आवडतात.जेठालाल घालत असलेले कपडे हे आपल्या आजूबाजूला सहजपणे दिसून येत नाहीत.हे कपडे एका विशिष्ट ठिकाणाहून मागवले जातात व याची किंमत लाखोंच्या घरामध्ये आहे.जेठालाल ची लोकप्रियता ही त्याच्या कपड्यांमुळे सुद्धा खूप वाढलेली आहे.या मालिकेचे निर्माते जेठालालच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतात व म्हणूनच त्याच्या लुकवर आणि कपड्यांवर लाखो रुपये खर्च केले जातात.

जेठालाल चे जे अनोखे कपडे आपल्याला कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतात ते मुंबईतील फॅशन डिझायनर जितूभाई लाखानी हे बनवतात.या शोच्या पहिल्या भागापासून आत्तापर्यंत जेठालाल ने घातलेले कपडे हे जितूभाई लाखानी यांनीच बनवलेले आहेत.जेठलाल घालत असलेल्या एका शर्टची किंमत ही लाखोंच्या घरात आहे कारण हे कपडे अगदी वेगळे व अनोखे बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते असे जितूभाई लाखानी सांगतात.

या मालिकेमधील जेठालालच्या कपड्यांची लोकप्रियता आता चाहत्यांमध्ये सुद्धा पसरली आहे व या प्रकारच्या कपड्यांची मागणी सुद्धा ग्राहकांकडून केली जाते.नेहमीच्या या भागांमध्ये सर्वसाधारण शर्टची किंमत ही 40 हजार रुपये असते तर एखाद्या सणसमारंभ किंवा उत्सवाच्या वेळी जेठालाल ने घातलेल्या कपड्यांची किंमत ही लाखो रुपये असते असे ते सांगतात.