Home » ज्याला समजत होतो छोटा मोठा ऍक्टर तो तर निघाला बच्चन कुटुंबाचा जावई, पाहून व्हाल आश्चर्यचकित…!
Celebrities Entertainment

ज्याला समजत होतो छोटा मोठा ऍक्टर तो तर निघाला बच्चन कुटुंबाचा जावई, पाहून व्हाल आश्चर्यचकित…!

बॉलीवूड हे एक मोठे कुटुंबच मानले जाते व यामध्ये बऱ्याचदा काही अभिनेते हे एकमेकांशी प्रत्यक्षात खाजगी आयुष्यातही नातेवाईक असतात मात्र ही गोष्ट फारशी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिले जात नाही. कुणाल कपूर हा रंग दे बसंती मधून चर्चेत आलेला हँडसम आणि अभिनयाच्या बाबतीत उत्कृष्ट असा अभिनेता सध्या बॉलीवूड मध्ये फारसा कार्यरत दिसत नाही.

त्याचे अभिनय कारकिर्दीमध्ये अगदी मोजके हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके सिनेमे प्रदर्शित झाले पण त्याचा चेहरा आज सुद्धा चाहते विसरु शकलेले नाहीत.केवळ एक चांगला अभिनेता म्हणूनच नव्हे तर बच्चन कुटुंबाचा नातेवाईक म्हणून सुद्धा कुणाल कपूर ची ओळख आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे.

कुणाल कपूर हा अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांचा जावई आहे. कुणाल कपूर ने अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना बच्चन यांच्यासोबत विवाह ची गाठ बांधली आहे. कुणाल आणि नयना जवळपास दोन वर्षे एकमेकांसोबत प्रेम संबंधांमध्ये होते व नंतर त्यांनी घरच्यांच्या संमतीने विवाह केला. नैना ही अभिनय क्षेत्रापासून दूर राहते व ती बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर करत आहे.

कुणाल कपूर एका व्यावसायिक कुटुंबामध्ये जन्मला असून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नसरुद्दीन शहा यांच्यासोबत रंगभूमीवर केली. त्याने सर्वात प्रथम बॉलीवूड मधील अक्स या मनोज वाजपेयी आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. बॉलीवूड मधील पदार्पणाचा चित्रपट हा तब्बू सोबत  मीनाक्षी द टेल आँफ  थ्री सिटी होता.हा चित्रपट प्रसिद्ध जगविख्यात चित्रकार एम एफ हुसेन यांनी साकारला होता.

कुणालच्या या चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर आमिर खान सोबत आलेल्या रंग दे बसंती या चित्रपटातील भूमिकेसाठी कुणालला सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला जगभरामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने यशराज प्रोडक्शनसोबत चित्रपटांचा करार केला होता. त्यानुसार त्याने लागा चुनरी मे दाग, आजा नचले ,बचना ऐ हसीनो चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला.

त्यानंतर त्याने काही काळ अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला .अभिनय क्षेत्रातच नव्हे तर कुणालने निरनिराळ्या जाहिरातीमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या संस्थेची स्थापनाही त्याने केली आहे ज्याद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाते.