Home » एकेकाळी ३० रुपये रोजाने काम करणारे घनश्याम नायक उर्फ नट्टू काका त्यांच्या पश्चात सोडून गेले कोटींची संपत्ती…
Entertainment

एकेकाळी ३० रुपये रोजाने काम करणारे घनश्याम नायक उर्फ नट्टू काका त्यांच्या पश्चात सोडून गेले कोटींची संपत्ती…

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेने संपूर्ण जगामध्ये चाहता वर्ग बनवला आहे.माघील दोन दशकापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रचंड लोकप्रियता होती.आणि हळूहळू या सर्व मालिकेची लोकप्रियता वाढतच गेली.

जेवढी ही मालिका लोकप्रिय ठरली तेवढीच लोकप्रियता या मालिकेमधीम कलाकारांना देखील मिळाली. या मालिकेमध्ये जेठालाल आणि त्याच्या भोवतालच्या घडामोडीचे कथन केलेले दिसून येते.इतकी वर्षे झाली पण या मालिकेची लोकप्रियता काही कमी झाली नाही.दया आणि जेठालाल बरोबर इतर कलाकार देखील प्रसिद्ध झाले.

या मालिकेमधील कलाकारांनी जे पात्र घेतलेले आहे त्याची लोकप्रियता इतकी जास्त आहे की त्यांना मालिकेतील नावानेच ओळखतात. तारक मेहता,जेठालाल,दया,टपू,बग्गा, भिडे गुरुजी,बबिता,नट्टू काका हे सर्व पात्र अत्यंत प्रसिद्ध आहेत.मालिकेच्या सुरुवातीला नवीन आणि साधारण भूमिका साकारणाऱ्या सर्व कलाकारांना संधी दिली होती आणि या संधीचा उपयोग या कलाकारांनी पूर्णपणे घेतला.

त्यामुळे आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना या मालिकेने स्वतःची ओळख निर्माण करून दिली. यामधील नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांनी बरेच वर्षे सिनेसृष्टीत काम केले.यामध्ये त्यांनी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले.

मात्र त्यांना नट्टू काका म्हणूनच ओळख मिळाली.रविवारी त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली. तेव्हापासून सगळ्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शो’क’क’ळा पसरली.त्यांनी खुप अगोदर पासूनच अभिनयाची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये काम मिळत नव्हते.

त्यामुळे जे काम मिळेल ते करावे लागत.जेवढे पैसे दिले तेवढेच घ्यावे लागत.कदाचित आता कोणाला पटणार नाही पण,काही अशी सिनेमा होती ज्याची पुर्ण शूटिंग झाल्यावर मानधन मिळत असे.ते काम तीन-चार दिवसाचे असेल तर ते पूर्ण झाल्यावर ९० किंवा १०० रुपये मिळत होते.एक इंटरव्ह्यू मध्ये स्वतः नट्टू काकांनी हे असे सांगितले होते

नट्टू काका यांनी ३५० पेक्षा जास्त मालिकेत काम केले आहे आणि ३१ पेक्षा जास्त सिनेमामध्ये.नट्टू काका लोकप्रिय कॉमेडी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ यामध्ये देखील काम केले होते. त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे  तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील नट्टू काकाच्या भूमिकेतून. जेठालाल च्या दुकानांमध्ये काम करणारे नट्टू काका या भूमिकेने त्यांचे नशिब झळकले.

यामालिकेमुळे त्यांना प्रसिद्धी, ओळख आणि पैसे सर्व मिळाले. त्यांनी बरीच गुंतवणूक केलेली होती त्यामुळे लॉ’क’डा’ऊ’न काळातही त्यांना पैसे मिळत राहिले.कधी काळी दिवसाला फक्त  ३० मानधन घेणाऱ्या नट्टू काकांचे मुंबईत दोन फ्लॅट्स, दुकाने आणि जमीन देखील आहे.त्यांच्या निधनाने पूर्ण टीव्ही इंदुस्ट्रीमध्ये शोक व्यक्त करण्यात आले.