Home » KGF मध्ये ‘रॉकीभाईला’ वेड लावणारी ‘रीना’ कोण आहे माहित आहे का? चित्रपटात येण्या अगोदर करायची हे काम…
Entertainment

KGF मध्ये ‘रॉकीभाईला’ वेड लावणारी ‘रीना’ कोण आहे माहित आहे का? चित्रपटात येण्या अगोदर करायची हे काम…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चित्रपट सध्या ब्लॉकबस्टर ठरत आहेत. या चित्रपटांच्या आवृत्ती केवळ त्यांच्या मातृभाषांमध्ये नव्हे तर अन्य भाषांमध्ये सुद्धा निर्माण होत आहे. या चित्रपटांना चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. केजीएफ चाप्टर टू हा चित्रपट असाच आहे. केजीएफ चाप्टर वन या चित्रपटाची लोकप्रियता इतकी जास्त होती  की  के जीएफ चाप्टर वन चित्रपटाच्या सिक्वलची सगळेच वाट पाहत होते.

केजीएफ चाप्टर टू या चित्रपटात रविना टंडन ,संजय दत्त हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटांमध्ये काम केले आहे व या दोघांचाही अभिनय चाहत्यांना खूपच आवडला आहे. यशने केजीएफ चाप्टर वन व  के जीएफ चाप्टर टू मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे. या सर्व स्टार्सच्या गर्दीमध्ये एक चेहरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे व तो चेहरा म्हणजे चित्रपटांमध्ये रॉकी भाईच्या गर्लफ्रेंडची भूमिका केलेल्या या अभिनेत्रीने.

ही अभिनेत्री म्हणजे श्रीनिधी होय. केजीएफ चाप्टर वन हा श्रीनिधीचा पहिलाच चित्रपट होता मात्र त्यामध्ये तिचे नवखेपण कुठेही जाणवले नाही. तिच्या वाट्याला फारसे संवाद आले नाही मात्र तिचा वावरच चाहत्यांसाठी खूप सुखद होता. श्रीनिधीने आपल्या करिअरची सुरुवात ही मॉडलिंग क्षेत्रापासून केली. तिने मिस इंडिया कर्नाटक ,मिस ब्युटीफूल स्माईली यांसारख्या स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.

2017 साली ती मिस इंडिया या मानाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार होती मात्र केजीएफ या चित्रपटाची ऑफर आली व तिने ही ऑफर स्वीकारली. या चित्रपटाने तिला सर्वत्र ओळख मिळवून दिली आहे व तिच्या चाहत्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते व तिचे जवळपास एक मिलियन इतके फॉलोवर्स इंस्टाग्राम अकाउंट वर आहेत.

तिच्या छायाचित्रांना चाहते नेहमीच पसंती दर्शवित असतात. केजीएफ या चित्रपटातील यशानंतर श्रीनिधी कोब्रा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. कोब्रा या चित्रपटामध्ये श्रीनिधीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार विक्रम आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू इरफान पठाण सहकलाकार म्हणून असणार आहेत. या चित्रपटामध्ये सु्द्धा श्रीनिधी निश्चितच आपल्या अभिनयाची कमाल दाखवेल.