Home » सलमान अगोदर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता होता ऐश्वर्यावर लट्टू, परंतु या व्यक्तीने धमकी दिल्यामुळे झाला दूर…!
Celebrities Entertainment

सलमान अगोदर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता होता ऐश्वर्यावर लट्टू, परंतु या व्यक्तीने धमकी दिल्यामुळे झाला दूर…!

कान्स येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ऐश्वर्या राय-बच्चननेही हजेरी लावली होती व दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सर्वांच्याच नजरा ऐश्वर्यावर खिळल्या होत्या. ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे अनेक दीवाने आहेत. ऐश्वर्याचे नाव घेतल्यावर सलमान खान ची चर्चा झाली नाही तर नवलच. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी या दोघांमध्ये प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली व त्यानंतर ऐश्वर्या वरील सलमानचे  प्रेम सर्वश्रुत झाले.

काही काळानंतर या दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊन ब्रेकअप  झाले. सलमानच्या अगोदर अजून एक दिग्गज अभिनेता ऐश्वर्याला डेट करू इच्छित होता मात्र त्याला जवळच्या एका व्यक्तीने अशी काही धमकी दिली की त्याने ऐश्वर्याचा नाद सोडून दिला. हा अभिनेता कोण आहे हे आज आपण जाणून घेऊया.

ऐश्वर्या रायने सर्वात प्रथम पेप्सीच्या जाहिरातीत द्वारे मॉडलिंग मध्ये पदार्पण केले. या जाहिरातीमध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्याची दखल सर्व स्तरांमध्ये घेतली गेली. ऐश्वर्याच्या पहिल्या जाहिरातीमधून तिच्या सौंदर्याचा सर्वत्र बोलबाला झाला. संजय दत्तने सुद्धा या जाहिरातीतील  ही मुलगी कोण आहे याबद्दल उत्सुक होता. काही दिवसांमध्येच संजय दत्तला ऐश्वर्या राय सोबत एका मासिकाच्या फोटोशूटसाठी ऑफर आली.

यावेळी संजय दत्त च्या बहिणीने त्याला ऐश्वर्याला तिचा नंबर मिळवण्याचा किंवा तिला फुले पाठवण्याचा प्रयत्न करायचा नाही अशी धमकी दिली. त्याच्या बहिणी ऐश्वर्या राय त्या अगोदर भेटल्या होत्या व ती एक चांगली मुलगी असल्याचे त्यांनी त्याला सांगितले. यामुळे संजय दत्त ने ऐश्वर्या रायला कोणत्याही प्रकारे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला नाही. ऐश्वर्या राय चित्रपटसृष्टीमध्ये आल्यावर संजय दत्त व तिने एकत्र काम केले .शब्द या चित्रपटांमधील या दोघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.