Home » भारताच्या ‘या’ माजी राष्ट्रपतींचा वंशज आहे ‘हा’ अभिनेता…!
Entertainment

भारताच्या ‘या’ माजी राष्ट्रपतींचा वंशज आहे ‘हा’ अभिनेता…!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान त्याच्या चाहत्यांमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट या नावानेही ओळखला जातो.आमीर खानने आपल्या अभिनयाने व परिश्रमाने बॉलीवुड मध्ये एक खास अशी जागा बनवली आहे.आमिरने बालकलाकार म्हणून खूप लवकरच अभिनयाची सुरुवात केली होती.1973 साली आलेल्या यादों की बारात या चित्रपटाद्वारे आमिरने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

आज वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी सुद्धा अमीर खान अभिनय क्षेत्रात खूपच सक्रिय आहे.आमिरचा जन्म 14 मार्च 1965 रोजी मुंबई येथे झाला. आमीरच्या वडिलांचे नाव ताहीर हुसेन व आईचे नाव झिनत हूसैन आहे.खूप सुरुवातीपासूनच आमीरला अभिनयामध्ये रस होता.मुख्य अभिनेता म्हणून आमीरने 1988 साली चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.आमीरचा पहिला चित्रपट होता कयामत से कयामत तक.या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले व हा चित्रपट सुपरहिट ठरला.

या चित्रपटातील आमिरच्या कामासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आत्तापर्यंत आमीरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे व त्यापैकी जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. वर्षाला एकच चित्रपट करण्याचा आमिरचा निर्णय आतापर्यंत त्याने पाळलेला आहे. आमीर केवळ अभिनेता नव्हे तर एक निर्माता ,दिग्दर्शक, लेखक व प्रोडक्शन कंपनीचा संस्थापक व मालक सुद्धा आहे.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल फार कमी बोलले जाते.आमीर खानच्या घरातील एक सदस्य भारताचे पूर्व राष्ट्रपती राहिले आहेत व एक सदस्य भारताचे माजी शिक्षा मंत्री म्हणून ओळखले जातात.महान स्वातंत्र्य सेनानी व विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आमिर खान हा भाचे पणतू लागतो.मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे माजी शिक्षा मंत्री होते.भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन हे सुद्धा आमीरचे नातेवाईक आहेत.

जाकीर हुसेन यांनी 1967 ते 1969 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती पद भूषवले आहे.त्याच प्रमाणे भारताच्या उपराष्ट्रपती व राज्यसभेच्या पाच वेळा सदस्य राहिलेल्या नजम हेपतुल्लासुद्धा आमिरच्या अगदी जवळच्या नातेवाईक आहेत.आमीरच्या वैयक्तिक आयुष्य प्रमाणेच व्यावसायिक आयुष्यामध्ये सुद्धा अनेक रोचक गोष्टी आहेत.त्यापैकी एक गोष्ट म्हणजे आमीरने बऱ्याच कालावधीपासून शाहरुख खान सोबत एकत्र काम केलेले नाही.

आमिर खान गेल्या 34 वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर शाहरूख खानला सुद्धा अभिनय क्षेत्रात येऊन तीस वर्षे पूर्ण झाले आहेत.मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की आतापर्यंत या दोघांनी एकत्र काम केले नाही.पहला नशा या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत हे दोघेजण झळकले होते मात्र यानंतर यांनी एकत्र काम केले नाही.एक काळ असा होता जेव्हा शाहरुख आणि आमीर खान एकमेकांचे शत्रू सुद्धा बनले होते.

शाहरुख खानने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की आम्ही आतापर्यंत एकत्र काम करण्यासंदर्भात कधीही बोललो नाही.वैयक्तिक आयुष्यामध्ये आम्ही एकमेकांना नेहमीच भेटत असतो मात्र पूर्वी प्रसारमाध्यमे आमच्या भेटी कव्हर करत नसत आता मात्र आम्ही भेटलो की लगेच त्याची बातमी होते.आमीर खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यामध्ये व्यस्त असून एप्रिल 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.