Krishna

श्रीकृष्णाची भूमिका साकारणारा हा कलाकार दोनदा अडकला आहे विवाहबंधनात, योगायोगाने दोन्ही बायका डेंटिस्ट

लाँकडाऊन च्या काळामध्ये काही दशकांपूर्वी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर प्रसारित केल्या जात आहेत. रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या श्री कृष्णा या मालिकेला ही प्रेक्षकांचा आत्तासुद्धा तुफान प्रतिसाद मिळत आहे .या मालिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण हे प्रमुख पात्र अभिनेता स्वप्निल जोशी यांनी साकारले होते. अभिनेता स्वप्नील जोशी यांनी याअगोदर ही अनेक  मालिकांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारल्या होत्या.

आज घडीला ते मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे अभिनेते आहेत. फिल्मी करियरमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते.भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या स्वप्नील जोशीच्या प्रत्यक्ष आयुष्यात तो दोनदा विवाहबंधनामध्ये अडकला आहे व योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या दोन्ही पत्नि या व्यवसायाने डेंटिस्ट अर्थात दंतरोग तज्ञ आहेत.

स्वप्नीलचा पहिला विवाह 2005 साली अपर्णा जोशी यांच्यासोबत झाला होता.अपर्णा व्यवसायाने डेंटिस्ट होत्या.नंतर जवळपास चार वर्षे स्वप्निल व अपर्णा एकत्र होते. 2009 साली हे दोघे कायदेशीररीत्या विभक्त झाले .या जोडीच्या विभक्त होण्यामागे नक्की काय कारण होते याबद्दल अनेक चर्चा झाल्या मात्र स्वप्नीलने यावर अतिशय समंजसपणे एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्यांनी एकमेकांना सोडले नाही तर त्यांच्या नात्यामधील प्रेम दुरावल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर 2011 साली स्वप्निल जोशीने दुसरा विवाह केला .स्वप्नील 2011साली लीना अराध्ये यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. योगायोगाची गोष्ट म्हणजे लीना यासुद्धा पेशाने डेंटिस्ट आहेत.

आयुष्यामध्ये विवाहाच्या बाबतीत घडलेल्या भूतकाळाबद्दल स्वप्निल जोशी असे म्हणतात की ते नियतीवर विश्वास ठेवतात व जे काही विधिलिखित असते तेच घडते आणि आता जे काही झाले आहे ते चांगल्यासाठीच कदाचित घडले असावे.एका छोटेखानी कौटुंबिक समारंभामध्ये लीना यांच्यासोबत स्वप्नीलने विवाह केला व आता ते दोघेही सुखाने संसार करत आहेत.

श्रीकृष्णांची भूमिका करण्याअगोदर प्रेक्षकांच्या आवडीची मालिका रामायण मध्ये ही स्वप्निल जोशी यांनी लव आणि कुश यांच्यामधील कुशची भूमिका केली होती.