Home » जाणून घ्या वटपौर्णिमा साजरी करण्याचे अध्यात्मिक कारण…
Festival

जाणून घ्या वटपौर्णिमा साजरी करण्याचे अध्यात्मिक कारण…

वटपौर्णिमा ही पुरातन काळापासून चालत आलेली हिंदू धर्मातील परंपरा आहे.वटपोर्णिमा हा सण दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण आहे.खर तर याच सणा पासुन सणांची सुरुवात होते असे देखील म्हणता येईल.यामागील इतिहास अतिशय रंजक सांगितला जातो.वटपौर्णिमा का आणि कशासाठी साजरी करतात सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठले होते आणि तेव्हापासूनच सुवासिंनीनी या व्रताची सुरूवात केली असे म्हटले जाते.आपल्या पतीला दिर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे यासाठी हे व्रत करण्यात येते असा समज आहे.

महाराष्ट्रातील महिला हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात.वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतात आणि वडाची पुजा करतात.या वर्षी हा सण २४ जुन या दिवशी आला आहे.साधारनपणे दरवर्षी वटपौर्णिमा जुन महिन्यातच येते. वटपोर्णिमेचा प्रारंभ २३ जुन पहाटे ३.३२ पासुन तर समाप्ती २४ जुन रात्री १२.०९ वाजेपर्यंत आहे.त्यामुळे दिवसभरात तुम्ही वडाची कधीही पुजा करता येते. 

वटपौर्णिमा म्हणजे काय आणि त्या मागचा इतिहास काय आहे आज आपण ते जाणून घेणार आहोत…

वटपौर्णिमा ही खूप  वर्षांपासून चालत आलेली हिंदू धर्मातील परंपरा आहे.वटपौर्णिमा का व कशासाठी साजरी करतात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण याच दिवशी  यमदेवाकडून परत आणले होते त्यामुळे सुवासनिंसाठी हा उपवास अत्यंत महत्वाचा मानला जातो.पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे  आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे या साठी महिला हे व्रत करतात.

असे म्हंटले जाते किसावित्रीने तिच्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली होती आणि यमदेवाने त्याच झाडाखाली तिच्या पतीचे प्राण परत केले होते.त्यामुळे या दिवशी वादाच्या झाडाची पूजा केली जाते.वटपौर्णिमेलाच जेष्ठ पौर्णिमा देखील म्हणतात.खार तर हे व्रत तीन दिवसाचे असते असे म्हणतात परंतु महिलांना आता तीन दवस व्रत करणे शक्य नसल्यामुळे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशीच उपवास पकडून हे व्रत केले जाते.

पौराणिक कथेनुसार भद्रा नामक देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता.त्याला सावित्री नावाची कन्या होती.सावित्री अतिशय सुंदर,नम्र आणि गुणी मुलगी होती.राजाने सावित्रीला स्वइच्छेने पती निवडण्याची परवानगी दिली होती.तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली.सत्यवान हा शान्व राज्याच्या धृतसेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता.

शत्रूकडून हरल्यामुळे आपली राणी आणि मुलासह राजा जंगलात राहत होता.भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षच राहिले हे माहित होते त्यामुळे सत्यवान सोबत लग्न न करण्याचा सल्ला त्यांनी सावित्रीला दिला परंतु सावित्रीने ते मान्य न करता सत्यवानसोबत विवाह केला आणि जंगलात त्याच्या सोबत राहून सासू-सासऱ्यांची सेवा करत होती.सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन-चार दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रतास आरंभ केले.सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर अली व तो जमिनीवर पडला यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले तेव्हा सावित्री यमदेवाबरोबर जाऊ लागली यमाने कित्येक वेळा सावित्रीस वापस जाण्यास सांगितले परंतु तिने जाण्यास नकार दिला आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला.अखेर यमाने कंटाळून पती सोडून दिला व तिला तीन वर मागण्यास सांगितले.

सावित्रीने सासऱ्याचे डोळे,राज्य आणि पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी हे वर मागितले.यमाने तथास्तु असे म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली परत मिळाले त्यामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.

वटपौर्णिमा कशी साजरी करावी : सकाळची सर्व कामे झाल्यानंतर वटपौर्णमेच्या दिवशी महिला वडाची पूजा करतात.गावाकडे आजही यादिवशी वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी गाणी गाऊन प्रार्थना केली जाते.या दिवशी सुवासिनी  सजून-धजून कोऱ्या साड्या नेसून खास पूजा करायला एकत्र जमतात.वडाच्या झाडाखाली जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळते आणि त्यामुळेच तिथे जाऊन ही पूजा करावी असे म्हणतात.हे व्रत सदर दिवशी केल्याने अखंड सौभाग्यप्राप्ती होते असा समज आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असाही समज आहे.

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य : वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही ठराविक साहित्य लागते. तुम्ही जर पहिल्यांदाच ही पूजा करत असाल आणि तुम्हाला याबद्दल माहीत नसेल तर संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. 

सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती,धूप – दीप – अगरबत्ती,तूप,पाच प्रकारची फळं (सफरचंद,केळी,संत्री,मोसंबी, चिकू),फुले,दिवा ठेवण्यासाठी रोवळी,वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा,पाण्याने भरलेला लहान कलश,हळद – कुंकू,पंचामृत (तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे),लहान हिरव्या बांगड्या ईत्यादी साहित्य सोबत ठेवावे.