Home » रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या या मागील इतिहास आणि पौराणिक कथा…
Festival

रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या या मागील इतिहास आणि पौराणिक कथा…

भारतीय संस्कृतीमधील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ हा सण बहिण-भावाचे उत्साह व  स्नेह याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.देशभरात ह्या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरा केला जातो, जो यावेळी २३ ऑगस्टला आहे.दरवर्षी बहीण विधीनुसार भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि तिच्या संरक्षणाचे वचन मागते.संरक्षित करण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी जो पवित्र धागा बांधला जातो त्याला ‘रक्षाबंधन’ म्हणतात.या दिवशी बहिणी आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात आणि भाऊ त्यांचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतात.

पण रक्षाबंधन का केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? रक्षाबंधन साजरे करण्यामागची कारणे काय आहेत ते आज आपण ते जाणून घेऊया…

पुराणात असे म्हंटले आहे की एकदा देव इंद्र जेव्हा दानवांकडून पराभव झाला होता.तेव्हा त्यांच्या पत्नी इंद्राणीने त्यांच्या उजव्या हातावर रक्षासूत्र बांधले होते.त्यामुळे इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर इंद्राने दानवावर विजय मिळवला होता.अशी पौराणिक कथा आहे. 

आणि तसेच महाभारतामध्ये जेव्हा श्री कृष्‍णाच्या हाताला जखम होऊन त्यातून रक्तस्त्राव होत होता.तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधला होता.तेव्हापासून श्री कृष्ण यांनी द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन दौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले होते.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन या सणाबद्दल अशी अनेक उदाहरणे आहेत.चित्तौढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे एक उदाहरण आहे.हुमायू यांनी राणी कर्मवती यांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

पौराणिक कथा व इतिहात वगळता रक्षाबंधन या सणात काळानुसार बदल होत गेलेला आहे.आता रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या अतुट नात्याचे,प्रेमाचे,स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरा केला जातो.बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारतो.

भारतामध्ये अजूनही प्रेम,आपुलकी आहे.म्हणून आजही रक्षाबंधन हा सणाचे महत्त्व आजही कायम आहे.