Home » गाजराचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला होतात हे फायदे
Food & Drinks News

गाजराचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला होतात हे फायदे

 कोवळी लुसलुशीत व ज्यांच्या रंगाकडे पाहून डोळ्यांना थंडावा मिळतो अशा गाजरांना खाण्याचे आपल्या केस, त्वचा आणि एकंदरीतच शरीरातील सर्व अवयवांसाठी खूप फायदे आहेत. गाजराचे सेवन नियमितपणे केले असता डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वाईट कोलेस्टरॉलचे प्रमाण घटते आणि वजन कमी करायला सुद्धा साहाय्य होते असे दिसून येते.गाजरामध्ये अँटी आँक्सिडंट,बीटा कॅरोटीन ,पोटॅशियम, मॅग्नेशियम ,फायबर आणि जीवनसत्व क इत्यादी मोठ्या प्रमाणात गाजरामध्ये असतात. गाजरामधील सर्व पोषक घटकांचे शरीरातील हरेक अवयवाला काही ना काहीतरी फायदे हे होतच असतात. आज आपण गाजराच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

1) गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन हे अँटिऑक्सिडंट असते.गाजराचे सेवन केल्यानंतर बीटा कँरेटिनचे रुपांतरजीवनसत्व अ मध्ये होते. गाजरामध्ये कॅरोटेनोईड किंवा अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. अ जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते.गाजराचे नियमित सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य नीट राहते. दृष्टी सुधारण्यास मदत होते.त्याच प्रमाणे गाजराचे नियमित सेवन.केल्याने वय वाढल्यानंतर दृष्टी कमी होण्यासारख्या समस्यांवरही उपाय होतो.

2) खाण्यावर नियंत्रण ठेवले असता वजन कमी होण्यास साहाय्य मिळते .गाजर हे कमी कॅलरीयुक्त पदार्थ आहे.गाजराच्या सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटते.गाजर खाल्ल्याने वारंवार खाण्याची इच्छा निर्माण होत नाही म्हणूनच वजन कमी करण्यासाठी गाजरा सारख्या कमी कँलरीयुक्त पदार्थामध्ये गणल्या जाणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
3) गाजरामध्ये असलेल्या अनेक औषधी गुणधर्मामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या कॅन्सरच्या पेशी निर्माण होण्यापासून आणि वाढण्यापासून प्रतिबंध केला जातो. गाजरामध्ये असलेल्या  अँटी आँक्सीडेंटमुळे कर्करोगापासून बचाव केला जातो.

4) कच्च्या भाज्यांचे सेवन केल्याने दातांना मजबुती मिळते. गाजराचे सेवन केले असता दातांमधून घाण व अन्नाचे कण काढून टाकले जातात .हिरड्यांना मजबुती मिळते व अन्नाचे पचन नीट होण्यासाठी आवश्यक असलेल्या लाळग्रंथीनाही चालना मिळते.
5) गाजर किंवा गाजर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक  घटक असतात त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास साहाय्य मिळते व परिणामी अनेक आजारांपासून आपला बचाव होतो.गाजराचे नियमित सेवन केल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास साहाय्य मिळते.

5) गाजरामध्ये असलेल्या अ जीवनसत्व सेवनामुळे शरीरातील टाकाऊ विषद्रव्ये शरीराबाहेर मुळापासून टाकली जातात.गाजरामध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे विषद्रव्य साचून राहत नाही तसेच यकृतामध्ये विषद्रव्ये साठवून दिली जात नाहीत. गाजरामध्ये पाण्यात सहजगत्या विरघळू शकणारे अन्य पदार्थ असतात यामुळे शरीरातील मल मूत्र विसर्जनाची प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे चालते.
7) गाजरामध्ये असलेल्या पाचक पदार्थांमुळे पचनाची प्रक्रिया सुलभ पद्धतीने चालू राहते. गाजरामध्ये असलेल्या तंतुजन्य पदार्थामुळे शरीरातील रक्त आणि आणि साखरेचे प्रमाण संतुलित राहते व व वजन घटवण्यास साहाय्य मिळते.

8) गाजर खाण्याचे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही फायदे आहेत मात्र स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित समस्यांवर गाजर अतिशय गुणकारी ठरते.विशेषतःमेनोपॉज च्या काळात  स्त्रियांना मासिक पाळी अनियमित होणे किंवा मासिक पाळीच्या काळात खूप जास्त त्रास होणे यांसारख्या समस्या  असतात. त्यांनी गाजराचे सेवन नियमितपणे  करावे.त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया मेनोपॉज च्या टप्प्यात आहेत त्यांना जळजळ होणे,  मूड स्विंग होणे यांसारख्या  समस्या असतात त्यांना सुद्धा गाजराच्या सेवनामुळे आराम मिळतो.

9)  गाजरा मध्ये मोठ्या प्रमाणात  पोटॅशियम असते  त्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीतपणे चालते.रक्ताभिसरणाचे कार्य करणाऱ्या धमन्या आणि अन्य रक्त वाहिन्यांना ही कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ दिला जात नाही.हायपर टेन्शन आणि रक्तदाबाच्या त्रासावर उपाय म्हणून नियमितपणे गाजराचे सेवन करावे. उच्चरक्तदाबामुळे  होणा-या हृदयाशी निगडित समस्या सुद्धा दूर ठेवल्या जातात.

10) गाजरामध्ये असलेल्या जीवनसत्व अ आणि जीवनसत्व के यांच्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.जीवनसत्त्वांच्या सेवनामुळे माथ्यावरील व केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण सुरळीतपणे होऊन केसांची वाढ तर होतेच मात्र केस पांढरे होणे पासून सुद्धा रोखले जातात .म्हणूनच आपले केस लांब आणि दाट होण्यासाठी रोज गाजराच्या ज्यूसचे सेवन अवश्य करावे.
11) केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षार आणि पोषकघटक यांचा मुबलक साठा गाजरामध्ये असतो .यामुळे गाजराच्या सेवनामुळे केसांचे गळण्याचे प्रमाण थांबते व परिणामी अकाली पडणाऱ्या टकला च्या समस्यापासूनही बचाव होतो.

12) पोषकघटकांच्या अभावी असलेल्या विविध जीवनसत्व आणि त्वचेशी निगडीत अनेक समस्या या आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करू शकतात. गाजराचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते जसे की अँक्ने, तारुण्यपीटिका इत्यादी समस्यांना दूर करण्यासाठी गाजराचे ज्यूस किंवा कच्चे गाजर नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
13) पोषक घटकांच्या अभावामुळे त्वचेवर कोरडेपणा निर्माण होतो. गाजरामध्ये असलेल्या पोटॅशिअम या घटकांमुळे गाजराचे सेवन केले असता शरीरावरील अतिरिक्त कोरडेपणा दूर होऊन शरीराला ओलावा मिळतो व आपली त्वचा मऊ आणि तजेलदार बनते.
14) गाजरामध्ये असलेल्या बीटा कॅरोटीन या घटकामुळे सूर्याच्या हानीकारक किरणांपासून त्वचेला होणारे नुकसान टाळता येते. सुर्यकिरणांच्या प्रत्यक्ष संपर्कात राहिल्यामुळे काळवंडलेपणा ,डाग निर्माण झाले असतील तर ते गाजराच्या नियमित सेवनामुळे दूर होतात.