Home » जि-याच्या सेवनामुळे शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम…
Food & Drinks

जि-याच्या सेवनामुळे शरीरावर होतात ‘हे’ दुष्परिणाम…

भारतीय आहार शास्त्राने भारतीयांच्या आहारामध्ये सामाविष्ट केलेले पदार्थ हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने जाणीवपूर्वक केलेले आहेत.भारतीय आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या घटक पदार्थांमधून शरीराला स्वाद व चवी सोबत अनेक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे फायदे सुद्धा मिळतात.भारतीय आहारात मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.जिरे मोहरीची फोडणी ही जणू काही भारतीय अन्नपदार्थांचा अविभाज्य भाग आहे.

जिरे यामुळे पदार्थाला उत्तम अशी चव तर मिळतेच पण याव्यतिरिक्त जि-याच्या सेवनाचे आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत.जिऱ्याचे तीन प्रमुख प्रकार आहेत पांढरे जिरे,काळे जीरे,शहाजिरे.या तीनही प्रकारच्या जि-यांचे गुणधर्म हे थोड्याबहुत फरकाने साधारण सारखेच असतात.जि-याच्या अतिसेवनाचे सुद्धा आपल्या शरीराला काही अपायकारक परिणाम होऊ शकतात.आज आपण जिऱ्याचे सेवनामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.

१) छाती मध्ये जळजळ होणे -जिऱ्याचे सेवन करणे हे पचनासाठी खूपच लाभदायक असते असे आपण पुर्वापार ऐकत आलो आहोत.जि-याच्या सेवनामुळे पोटामध्ये अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवत नाही मात्र अति प्रमाणात जिऱ्याचे सेवन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस किंवा वायू व यामुळे छाती मध्ये जळजळ होऊ शकते.

२) जास्त प्रमाणात ढेकर येणे- जि-याच्या अति प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटामध्ये अतिरिक्त गॅस निर्माण होतो व हा गॅस करपट ढेकर आणि गुदृदाद्वारे सुद्धा बाहेर पडतो. या ढेकरांना कधीकधी दुर्गंधी सुद्धा असते व सार्वजनिक ठिकाणी यामुळे शर्मिंदा व्हावे लागते.

३) किडनीवर प्रभाव-जि-यामध्ये मोठ्या प्रमाणात तेल अस्तित्वात असते. जि-याच्या अतिरिक्त सेवनामुळे आतडे आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ जिऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे हा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे जिऱ्याचे नेहमीच योग्य प्रमाणात सेवन करावे.

४) गर्भवती स्त्रियांसाठी हानीकारक- जि-याचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यामुळे गर्भवती स्त्रियांना गरोदरपणाच्या काळामध्ये गर्भपात किंवा अकाली प्रसव वेदना सुरु होण्या सारखे परिस्थितीस सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही पदार्थाचा अतिरेक करू नये व नेहमी आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.

५) थकवा व आळस येणे- जि-यामध्ये अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्यास काही मानसिक अवस्थेवर परिणाम टाकणारे सुद्धा गुणधर्म असतात.जिऱ्याचे अतिरिक्त सेवन केले असता आळस निर्माण होणे किंवा थकवा येणे यांसारख्या गोष्टी घडतात.मासिक पाळीच्या समस्या-जि-याचे अति प्रमाणात सेवन केल्यास मासिक पाळी मध्ये खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. म्हणूनच नेहमी योग्य प्रमाणात जिऱ्याचे आपल्या आहारात सेवन करावे.

६) मधुमेहींसाठी हानीकारक- जि-याच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरातील रक्तामधील शर्करेच्या प्रमाणावर ही परिणाम घडून येतो. जि-याच्या अति प्रमाणात सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. म्हणूनच जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये एखाद्या शस्त्रक्रियेला सामोरे जाणार असाल तर डॉक्टर शरीरातील रक्त आणि शर्करेची पातळी संतुलित राखण्याचा सल्ला देतात.

७) मधुमेह असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ही योग्य आणि संतुलित राहणे खूप आवश्‍यक असते रक्तातील साखरेचे किंवा ग्लुकोजचे प्रमाण हे कमी जास्त होणे हे आरोग्यासाठी चांगले नाही.जि-याच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे झपाट्याने कमी होते म्हणूनच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शक्यतो जिऱ्याचे कमी प्रमाणात सेवन करावे.

८) स्तनदा माता नी जिऱ्याचे सेवन शक्यतो टाळावे असे अनेकदा सांगितले जाते कारण जि-याच्या अतिसेवनामुळे दुधाचे प्रमाण कमी होते.जि-याच्या सेवनामुळे होणारा हा दुष्परिणाम सर्वांनाच लागू होत नाही मात्र तरीही शक्यतो स्तनदा मातांनी जि-याला आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणात समाविष्ट करावे.