Home » दररोज एक खजूर खा आणि मिळवा हे आश्चर्यकारक फायदे
Food & Drinks News

दररोज एक खजूर खा आणि मिळवा हे आश्चर्यकारक फायदे

 खजूर या फळाचे सेवन गेल्या अनेक शतकांपासून सर्व स्तरांमधून केले जाते.खजूर हे इसवी सन पूर्व 5320 इतके प्राचीन फळ मानले जाते. हे फळ पूर्वी मध्य पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रामुख्याने खाल्ले जाणारे अन्न होते.खजूरमध्ये असलेल्या अनेक विविध प्रकारच्या सूक्ष्म पोषण मूल्यांमुळे खजुराचे सेवन करणे खूपच फायदेशीर मानले जाते. ठजुरचे सेवन का करावे यासाठी खजूरच्या सेवनाने होणार्‍या फायद्यांची यादी निश्चितच खूप  लांबलचक बनेल. आज आपण खजुराचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात हे जाणून घेणार आहोत.

1) खजूर हे फळ त्यामधील नैसर्गिक शर्करे मुळे जास्त पौष्टिक मानले जाते. विशेष गोष्ट अशी की वाळवलेल्या खजुरा पेक्षा ताज्या खजुरा मध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. पौष्टिक घटकांमुळे आणि कॅलरीज मुळे इस्लामधर्मीय बहुसंख्य असलेल्या देशांमध्ये आहारामध्ये प्रामुख्याने खजूरचा समावेश केला जातो. उपास करण्याच्या वेळेस इस्लाम धर्मीयां कडून सकाळच्या वेळेत खजुरचे सेवन केले जाते जेणेकरून दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा संचय केली जाऊ शकते.

2) खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि अन्य फायबर व प्रथिने असतात. यामुळे खजूर हे अतिशय पौष्टिक असे फळ मानले जाते .पौष्टिक घटकांमुळे संपूर्ण जगभरामध्ये अतिशय आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे खजूर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात  अँटीऑक्सीडेंट असतात त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरळीत चालू ठेवले जाते आणि कॅन्सर सारख्या आजारांनाही फैलाव होण्यापासून प्रतिबंध केला जातो.

3) खजुरा मध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील तंतुजन्य पदार्थांमुळे ज्या व्यक्तींना पचनाशी निगडित समस्या असतात त्यांना पचन क्रिया प्रभावीपणे होण्यासाठी सहाय्य मिळते.खजुरा मध्ये असलेल्या न विरघळणा-या तंतुजन्य पदार्थांमुळे मलविसर्जनाचे कार्य सहजपणे चालते व आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवले जाते.
4) खजूरमध्ये फँट खूप कमी प्रमाणात असतात व कोलेस्टेरॉलचे प्रमाण नगण्य असते त्यामुळे खजूर सेवन योग्य त्या प्रमाणात दररोज केल्यास कोलेस्टेरॉलच्या वाढीवर नियंत्रण ठेवले जाते आणि पर्यायाने हृदयविकाराचे समस्यांपासूनही बचाव केला जातो.

5) जर तुम्हांला प्रथिने युक्त पदार्थ आपल्या आहारात सामाविष्ट करायची असतील तर खजूर हा अतिशय उत्तम पर्याय आहे.खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात.खजूरच्या नियमित सेवनामुळे स्नायूंना बळकटपणा आणि मजबूत पणा मिळतो.जिममध्ये जाणा-या व्यक्तींनी विशेषतः खजूरचे सेवन करावे.

6) खजुरमध्ये मोठ्या प्रमाणात सेलेनियम, तांबे,मँग्नेशिअम, कँल्शिअम या घटकांचा सामावेश असतो.हे सर्वच घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.हाडांचे आरोग्य टिकवून.ठेवण्यासाठी नियमितपणे खजूरचे सेवन करावे.
7) खजूरमध्ये योग्य प्रमाणात पोटँशिअम आणि सोडियम असते.पोटँशिअम च्या योग्य प्रमाणामुळे कोलेस्टेरॉलच्या वाढीस आळा घातला जातो.व परिणामी ह्रद्यविकाराच्या झटक्यापासूनही बचाव होतो.

8) खजूरमध्ये दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले फ्लुओरिन तर असतेच मात्र याव्यतिरिक्त लोहसुद्धा मोठ्या प्रमाणात असते.लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी खजूरचे सेवन अवश्य करावे.लोहाच्या कमतरतेमुळे अँनिमियासारख्या समस्या निर्माण होतात.अँनिमियामुळे अकारण थकवा जाणवणे,छातीत जळजळ होणे,श्वास घेण्यास त्रास जाणवणे इत्यादी समस्या निर्माण होतात.अँनिमियापासून बचाव करण्यासाठी खजूरचे सेवन अवश्य करावे.

9) खजूरमध्ये असलेल्या जीवनसत्त्व अ क आणि ड मुळे त्वचेचा पोत सुधारतो.त्वचेमध्ये लवचिकपणा निर्माण होतो आणि त्वचा मऊ बनते.म्हणून त्वचेला निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी खजूरचे सेवन नियमितपणे करावे.
10) खजूरमध्ये असलेल्या नैसर्गिक शर्करा,प्रथिने आणि जीवनसत्त्वे इत्यादी सर्वच घटकांमुळे वजन घटवण्यास साहाय्य मिळते.
11) खजछरमध्ये असलेल्या जीवनसत्त्व अ मुळे द्रुष्टी सुधारण्यास साहाय्य मिळते.रातांधळेपणाच्या समस्येवरही खजूर खाणे हा उत्तम उपाय आहे.
12) लैं गि क क्षमता वाढविणे आणि लैंगिक संबंधांमध्ये रस निर्माण होण्यासाठी रोज रात्रभर पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवलेली खजूर खाण्यामुळे बराच फरक पडलेला दिसून येतो.