Home » फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खात असाल तर सावध व्हा, आरोग्यासाठी आहे अत्यंत धोकादायक…!
Food & Drinks

फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खात असाल तर सावध व्हा, आरोग्यासाठी आहे अत्यंत धोकादायक…!

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शोधामुळे माणसाचे आयुष्य खूपच सुकर झाल्याचे दिसून येते.आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा विविध यंत्रांच्या वापरामुळे आपल्या शारीरिक श्रमांना वाचवले जाते.रेफ्रिजरेटर किंवा फ्रिज हा असाच एक पर्याय आहे.फ्रिजमध्ये वस्तू थंड तापमानामध्ये दीर्घकाळ साठवून ठेवल्या जाऊ शकतात म्हणूनच सध्याच्या काळात जेव्हा एखादा पदार्थ उरतो तेव्हा तो टिकून ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला जातो.

मात्र एखादा राहिलेला पदार्थ पुन्हा खाण्यासाठी वापरात आणण्यास योग्य राहावा यासाठी तो फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर काही काळजी घेणे आवश्यक असते.पण बऱ्याचदा फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ जसे की भाज्या-फळे इत्यादीं सोबतच आपण राहिलेले अन्न सुद्धा ठेवून देतो.मात्र यामुळे आपल्या फ्रिजमध्ये जीव जंतूंचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते.म्हणूनच कच्चे पदार्थ व शिजवलेले पदार्थ फ्रिजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाकून व्यवस्थित ठेवावेत.

१) राहिलेला भात आपण फ्रिज मध्ये ठेवून देतो.फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे भात खराब होत नाही मात्र हा भात दोन दिवसांच्या आत जर खाल्ला नाही तर याचे आपल्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात म्हणूनच फ्रिज मध्ये ठेवलेला भात हा दोन दिवसांच्या अगोदरच खाऊन टाकावा.यामुळे त्याचे पोषण मूल्यही आपल्याला मिळते.

२) जर आपण फ्रिजमध्ये पोळी ठेवत असू तर ती दीर्घकाळपर्यंत खराब होत नाही.अगदी एक आठवड्यापर्यंत आपण फ्रिजमध्ये पोळी ठेवून ती बाहेर काढून तूप किंवा लोणी सोबत गरम करून खाऊ शकतो मात्र त्याचे पोषणमूल्य निश्चितच कमी होते व अनेकदा काही लोकांना यामुळे पोटदुखीच्या समस्याही निर्माण होतात.

३) विविध प्रकारच्या डाळींचे सेवन करणे हे प्रथिने मिळवण्यासाठीचा अतिशय उत्तम मार्ग आहे.जेव्हा डाळीचे वरण किंवा आमटी शिल्लक राहते तेव्हा ती फ्रिजमध्ये आपण साठवू शकतो.मात्र हि डाळ किंवा आमटी दोन दिवसांच्या आत मध्ये संपवली गेली पाहिजे अन्यथा यामुळे गॅसच्या समस्या निर्माण होतात.

४) एकदा कापलेली फळे फ्रीजमध्ये तशीच्यातशी ठेवली जातात मात्र यामुळे ही फळे खाणे योग्य राहत नाही.फळे कापल्यानंतर ती लवकरात लवकर खाणे खूप आवश्यक असते.म्हणूनच शक्यतो फ्रिज मध्ये फळे कापून ठेवणे टाळावे.

५) कोणतेही फळ कापल्यानंतर ते सहा ते आठ तासांच्या आत खाणे आवश्यक असते.तसेच शिजवलेल्या भाज्या सुद्धा जर फ्रीजमध्ये ठेवले असतील तर त्या 24 तासांच्या आत खाव्यात.वारंवार फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न कोणतीही काळजी न घेता आपण सेवन करत राहिलो तर यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते व अन्यही काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.