Home » मसूर डाळीच्या सेवनामुळे होतात ‘हे’ फायदे…
Food & Drinks News

मसूर डाळीच्या सेवनामुळे होतात ‘हे’ फायदे…

निरोगी स्वास्थ्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, फळे ,मांस जन्य पदार्थ ,डाळी, कडधान्ये इत्यादी सेवन करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक मानले जाते.आपल्या आहारामध्ये डाळीचे सेवन हे मोठ्या प्रमाणात केले जाते. डाळीचे सेवन आमटी,भाजी, इत्यादींच्या स्वरूपामध्ये याचा वापर केला जातो. आज आपण अशाच एका डाळी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी बहुविध फायदे घेऊन येते. मसुरची डाळ ही प्रथिने आणि फायबर चा खूप समृद्ध स्त्रोत मानले जाते. फक्त एक कपभर मसूरच्या डाळीमध्ये 230 कॅलरी आणि फायबर व प्रथिने खूप मोठ्या प्रमाणात असतात. आज आपण मसुर डाळीचे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

1) मसूर डाळ हे प्रथिने, फायबर आणि अन्य पोषक घटकांनी समृद्ध असा पदार्थ आहे.मसूर डाळीमुळे आपल्या शरीराच्या पोषण मूल्य आणि प्रथिनांशी निगडित गरजा अगदी सहजपणे एका परिपूर्ण जेवणाच्या स्वरूपात भागवल्या जातात. मसुरची डाळ ही भिजवायला आणि शिजायला सुद्धा कमी कालावधी लागतो.

2) मसूरच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचा समावेश असतो तसेच मसुरची डाळ ग्लायसेमिक इंडेक्सच्या बाबतीत कमी असते आणि छोट्या आतड्यामध्ये पदार्थांचे कोणत्याही घटकाचे अतिरिक्त संचय होण्यापासून या डाळी द्वारे रोखले जाते. पचनाची प्रक्रियाही योग्य गतीने पार पाडली जाते त्यामुळे रक्ताच्या पातळीमध्ये साखरेची पातळी अगदी जलद गतीने कमी किंवा जास्त होण्यापासून प्रतिबंध केला जातो. म्हणूनच ज्या व्यक्तींना मधुमेहासारखी समस्या आहे किंवा ज्यांच्या मध्ये इन्शुलिनच्या निर्मितीस अडचणी निर्माण होतात अशा व्यक्तीने मसुरच्या डाळीचा आपल्या आहारात नियमितपणे समावेश केला पाहिजे.

3) मसूर मध्ये असलेल्या डाएटरी फायबर मुळे शरीरामध्ये अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यापासून रोखले जाते तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया सुदधा सुरळीतपणे चालते यामुळे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराच्या समस्येपासून बचाव होण्यास साहाय्य मिळते.
4) वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मसूर हे एक अतिशय उत्कृष्ट पर्याय मानले जाते. मसूर मध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे आणि प्रथिनांमुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामुळे अतिरिक्त खाण्याला आळा घातला जातो.मसूर डाळीच्या सेवनाने चयापचयाची प्रक्रिया नियंत्रित ठेवली जाते ज्यामुळे वजनही नियंत्रित केले जाते.

5) मसुरची डाळ ही निरनिराळ्या अँटिऑक्सिडंट ने परिपूर्ण असते.त्यामुळे अकाली व्रुद्धत्वाच्या समस्येला दूर ठेवले जाते.मसूर डाळीमधील अँटिऑक्सिडंट मुळे प्रतिकारशक्ती वाढवता येते.शरीरातील पेशींची हानीही भरुन काढता येते.मसूर डाळीचे सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि तजेलदार बनते.मसूर डाळीचे सेवन करण्यासोबतच मसूरच्या डाळीचा लेप चेह-याला लावावा.
5) मसुरच्या डाळीमध्ये जीवनसत्त्व,आणि निरनिराळे पोषक घटक जसे की कँल्शिअम,मँग्नेशिअम सुद्धा  मुबलक प्रमाणात असतात.या घटकांमुळे दात आणि हाडांच्या आरोग्यला निरोगी ठेवता येते. दात आणि हाडांचे आरोग्य व्यवस्थित नीट ठेवण्यासाठी नियमित पणे मसूरच्या डाळीचा सामावेश आहारात करावा.

7) मध्ये विटामिन सी आणि इत्यादी मोबाइल प्रमाणात असतात जीवनसत्वामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी निरोगी राहण्यासाठी माहिती.एक कप मसुर डाळीचे सेवन दररोज नियमितपणे केल्यास.डोळ्यांच्या समस्यांना प्रतिबंध केला जातो. डोळ्यांशी निगडित समस्या जसे की मोतीबिंदू, डोळ्याच्या स्नायूंना होणारी हानीसुद्धा भरुन काढता येते.
8) तुम्हाला नितळ आणि समजदार त्याच्या हवी असेल तर मसूरची डाळ हा एक उतँतम पर्याय आहे.मसूरच्या डाळीच्या सेवनामुळे चेह-यावर निर्माण होणाऱ्या सुरकुत्या,डाग,तारुण्यपिटिका इत्यादी दछर केले जाऊ शकतात.मसूर डाळ,गुलाब जल,आणि मध यांच्या साहाय्याने तयार केलेला फेस पँक लावला असता चेह-यावरील डाग दूर होतात.

9) मसुरच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फोलेट, पोटॅशियम ,मँग्नेशिअम,लोह असते. यामुळे पोटामध्ये, छातीत होणारी जळजळ कमी होण्यास साहाय्य मिळते.
10) मसूरच्या डाळीमध्ये असलेल्या फायबर,फोलेट इत्यादी घटकांमुळे कँन्सरसारख्या आजारांपासून प्रतिबंधात्मक बचाव केला जातो.
11) मसूरच्या डाळीमध्ये असलेल्या डाएटरी फायबरमुळे पचनास.साहाय्य मिळते.डाएटरी फायबरमुळे पोट साफ होते आणि शौचास साहाय्य मिळते.