Home » हिवाळ्यात मुळा खाल्ल्यामुळे शरीरास मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!
Food & Drinks

हिवाळ्यात मुळा खाल्ल्यामुळे शरीरास मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…!

थंडीचा मौसम सुरू झाला की गरम गरम पराठे,थालीपीठ, सूपचे सेवन करण्यास खूप पूर्वीपासून सांगितले जाते.थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अंतर्गत उष्णता किंवा ऊर्जा मिळणे खूप आवश्‍यक असते.यामुळे हिवाळ्यात पिकणार्‍या भाज्या आणि फळांचे सेवन अवश्य करावे ज्याद्वारे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळू शकते.हिवाळ्यामध्ये अनेक पालेभाज्या,फळभाज्या,कंदमुळे यांची बाजारामध्ये रेलचेल आपल्याला दिसून येते.अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुली के पराठे खातांना आपल्याला नायक दिसून येतो.

मुळ्याचे पराठे आणि गाजराचा हलवा हे समीकरण तर बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये वर्षानुवर्षे चालल्याचे दिसून येते.हिवाळ्यामध्ये मुळ्याचे सेवन अनेक भागांमध्ये अगदी आवर्जून केले जाते.मुळ्याचे सेवन हे भाजी,पराठे,लोणचे यांच्या माध्यमातून केले जाऊ शकते .मुळ्याचे सेवन तुपासोबत करावे असे ज्येष्ठांकडून सांगितले जाते.मुळ्याची भाजी ही अतिशय पौष्टिक मानली जाते.आज आपण या मुळ्याच्या भाजी विषयी आणि त्या पासून आपल्या शरीराला मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.

१) मूळा हे एक मूलवर्गीय प्रकारातील भाजी आहे.मुळा हा चवीला काहीसा तिखट असतो.मुळ्याचा तिखटपणा हा त्याच्या उगवण्याच्या हंगामावर अवलंबून असतो.त्याला ज्यूस च्या स्वरूपात पिले जाऊ शकते यामुळे सायनसचा आणि घशाच्या खवखवीच्या त्रासापासून मुक्तता मिळते.

२) मुळ्यामध्ये असलेल्या जीवनसत्वामुळे शरीराचा दाह होत नाही.यासाठी सलादमध्ये सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. मुळ्या मध्ये असलेल्या जीवनसत्वामुळे त्वचेच्या खाजेसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.मुळ्यामध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे किडणी स्टोन पासून बचाव होतो.

३) वजन कमी करण्यासाठी शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबरचे सेवन केले पाहिजे. कारण फायबर हे पचण्यास जास्त कालावधी लागतो. त्यामुळे खूप जास्त काळपर्यंत पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामुळे मधल्या वेळेच्या वारंवार खाण्याच्या प्रकारांना आळा बसतो. हे सर्व वजन कमी करण्यास साहाय्य करतात.मुळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंतू जन्य पदार्थ असतात.कमी कॅलरीजनी युक्त आणि जास्त फायबर ने संपन्न असलेल्या मुळ्याचे तुपासोबत सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

४) शरीरातील विषद्रव्ये आणि मलविसर्जनाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तंतुजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते .मुळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे मुळ्याचे सेवन केले असता मलमूत्र विसर्जनाची प्रक्रिया सुलभ पद्धतीने होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास ही दूर होतो.

५) मुळ्याचे सुप किंवा ज्यूस हे कफ आणि घशाच्या त्रासासाठी खूपच उपयुक्त ठरते.मुळ्याच्या रसाच्या सेवनामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.

६) मुळा हा त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच गुणकारी मानला जातो. त्यामध्ये खूप पोषक घटक असतात.मुळ्यामध्ये जीवनसत्त्व क,जीवनसत्त्व बी कॉम्प्लेक्स आणि मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असते.हे सर्व घटक त्वचेला मुलायम आणि सतेज बनवण्यासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाणही खूप जास्त असते.त्यामुळे त्वचेला डीहायड्रेशन होऊ दिले जात नाही.मुळ्या मध्ये असलेल्या ऑंटी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेला कोरडे पडू दिले जात नाही व आणि हानी झालेल्या त्वचेलाही लवकर भरून काढली जाते.

७) मुळ्यामध्ये पोटॅशियम,मॅग्नेशियम,अनेक जीवनसत्वे,फायबर मोठ्या प्रमाणात असतात. मुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लेवोनाईड असतात. मुळा मध्ये असलेल्या फायबर मुळे शरीरामध्ये  कोलेस्टेरॉलची निर्मिती होत नाही त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव राहत नाही.

८) हार्मोन असंतुलनाचा त्रास होत असेल तर नियमितपणे मनुष्याचे सेवन करावे त्यामुळे त्रास कमी होतो.हार्मोन असंतुलनामुळे जर चेहऱ्यावर मुरूम आणि तारुण्यपीटिका येत असतील तर मुळ्याचे नियमितपणे सेवन करावे यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.जर पोटात अपचनामुळे वायू धरतो असेल तर मुळ्याचे सेवन अवश्य करावे.