Home » आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे जाणून घ्या…
Uncategorized

आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे जाणून घ्या…

अम्रुत किंवा चिरतारुण्य प्रदान करणारा रस असे म्हटले जाणारा आवळ्याचे रस हा आपल्या संपूर्ण शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.त्यामुळेच प्राचीन साहित्यात आवळ्याच्या रसाला अमृताची उपमा दिली जाते त्यामध्ये निश्चितच काहीही वावगे नाही.आवळ्या मध्ये आपल्या त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्या सोबतच शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालणे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त औषधी गुणधर्म असतात.प्रतिकारक्षमता वाढवण्यासोबत आवळ्याच्या रसामुळे केसांना चमक आणि दाटपणाही  प्राप्त होतो.आज आपण आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

१) आवळ्याच्या रसामध्ये जीवनसत्व क आणि लोह या शरीराला आवश्यक गुणधर्मांचा मुबलक साठा असतो.जीवनसत्व क आणि लोहाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहते.त्वचा नितळ बनते.

२) वातावरणातील बदलामुळे सर्दी,खोकला यांसारखे आजार होणे अगदी सामान्य गोष्ट आहे मात्र आवळ्याचा रस दिवसातून दोन वेळा मधासोबत सेवन केला असता अस्थमा,ब्रोंकाइटिस यासारख्या आजारांवर सुद्धा उपाय केला जाऊ शकतो

३) आपल्या शरीरातील अतिरिक्त  चरबी नाहीशी करण्यासाठी एक ग्लासभर आवळ्याच्या रसाचे सेवन सकाळी अवश्य करावे.आवळ्याच्या रसामुळे शरीरातील प्रोटीन एच या प्रक्रियेस चालना मिळते आणि त्यामुळे शरीरातील नायट्रोजनची पातळी वाढते आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते परिणामी वजन कमी होण्यास साहाय्य मिळते.

४) आवळ्याचा रस पोट आणि पचनाशी निगडित अनेक आजारांवर प्रभावी उपाय करतो.आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांसारख्या आजारांवर उपचार करता येतात.मलविसर्जनास होणारा त्रास सुद्धा आवळ्याच्या रसामुळे कमी होतो.

५) आरोग्य निरोगी राखण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन अवश्य करावे.आवळ्याच्या रसामुळे ओटीपोटात होणाऱ्या जळजळीला थांबवले जाते.पेप्टिक अल्सर आणि तोंडामध्ये निर्माण होणारा आंबटपणा यांसारख्या समस्यांवरही आवळ्याचा रस प्रभावी ठरतो.आवळ्याच्या रसाचे तुपासोबत सेवन केल्यास अँसिडिटी दूर होते.

६) आवळ्याच्या रसामुळे जुलाब आणि उलट्या होण्यापासूनही आराम मिळतो.आवळ्याचा रस हे रक्तशुद्धी होणे व अनेक प्रकारचे त्वचाविकारापासून सुटका मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.आवळ्याचा रसामध्ये रक्त शुद्ध करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात त्यामुळे शरीरातील विषद्रव्य सुद्धा शरीरातून बाहेर टाकली जातात.आवळ्याच्या रसाचे नियमित सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते आणि लाल रक्तपेशींची संख्या वाढते.

७) डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवळ्याचा रस अतिशय गुणकारी ठरतो. आवळ्याच्या रसाच्या सेवनामुळे मोतीबिंदूला  अटकाव केला जातो तसेच डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळ्यांमध्ये लालसरपणा निर्माण होणे किंवा डोळ्यांमध्ये पाणी येणे इ.समस्या नियंत्रणात ठेवता येतात.

८) आवळ्याच्या रसाच्या सेवनामुळे हृदयाच्या स्नायूंना मजबुती प्राप्त होते आणि हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुरळीतपणे चालतो.मधुमेह असलेल्या व्यक्तींना आवळ्याचा रस हे जणू काही वरदानच असते.रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म आवळ्याच्या रसामध्ये असतात. आवळ्याचा रस मध आणि हळद एकत्र करून दिले असता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. आवळ्यामध्ये क्रोमियमचे प्रमाण योग्य असते.

९) अतिरिक्त उष्णता कमी करणे,शरीराला होणारा दाह कमी करण्यासाठी क जीवनसत्व आवश्यक असते.आवळ्या मध्ये सु जास्त प्रमाणात क जीवनसत्व असते.आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे अतिरिक्त उष्णतेमुळे होणारे नुकसान टाळता येते व अतिनील किरणांपासून संरक्षण मिळते.

१०) तोंडाचे आरोग्य दातांचे आरोग्य निकोप राखण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करणे खूपच उपयुक्त ठरते.आवळ्याच्या रसामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांनाही मजबुती मिळते.निद्रानाशाच्या त्रासावर ह्या आवळ्याच्या रसाचा खूपच फायदा होतो.आपल्याला झोप येण्यास त्रास होत असेल तर आवळ्याच्या रसामध्ये थोडीशी जायफळाची पावडर मिसळून सेवन केले असता शांत झोप लागते.

११) आवळ्याच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीआँक्सिडंट असतात. अँटीआँक्सिडंटमुळे शरीरातील पेशींच्या वाढीस प्रतिबंध घातला जातो.वाढत्या वयाबरोबर आपल्या हाडांना कमजोरी येते व ते नाजूक बनतात.हाडे मजबूत बनवण्यासाठी आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे.

१२) मासिक पाळीच्या काळात पायांना पेटके आल्यासारखे वाटते व यामुळे ओटीपोटात वेदना होतात म्हणूनच आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे कारण आवळ्याचा रसामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे व जीवनसत्त्वे असतात जी या त्रासापासून आराम देतात.

१३) आवळा रस मध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात.आवळ्यामध्ये कॅल्शियम,फॉस्फरस ,जीवनसत्त्व क ,जीवनसत्त्व के इत्यादी मोठ्या प्रमाणात असतात.पोषक घटकांच्या मुबलक साठ्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा नितळ होते. त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी आवळ्याच्या रसासोबत मध मिसळून ते मिश्रण घ्यावे.

१४) केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा आवळ्याच्या रसाचे अनेक फायदे असतात.आवळ्याच्या रसामुळे केसांच्या गळण्याचे प्रमाण कमी होते आणि अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुद्धा बचाव होतो.केसांना सतावणाऱ्या कोंडा,चाई इत्यादी समस्यांपासून सुद्धा आवळ्यामध्ये असलेल्या एन्ट्री बॅक्टेरियल या गुणधर्मामुळे बचाव होतो.

१५) आवळ्याच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते व जीवनसत्वाच्या नियमित सेवनामुळे अकाली वृद्धत्वाच्या समस्या,सुरकुत्या,चेहऱ्यावरील डाग दूर होतात म्हणूनच आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केले असता अकाली वृद्धत्व येत नाही.