Home » धन्याचे आरोग्यदायी ७ फायदे,‘७’ वा फायदा वाचून व्हाल चकित!
Uncategorized

धन्याचे आरोग्यदायी ७ फायदे,‘७’ वा फायदा वाचून व्हाल चकित!

कोथिंबीर,धने किंवा धण्याची पावडर ही भारतीय स्वयंपाकाची खासियत आहे.भारतीय जेवणामध्ये अन्य मसाल्यांप्रमाणे याचा वापर सुदधा खूप जास्त प्रमाणात केला जातो.शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणामध्ये धन्याचा वापर हमखास केला जातो. त्यामुळे जेवणाला केवळ स्वाद किंवा सुवास येत नाही तर याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.आयुर्वेदामध्ये सुद्धा धन्याच्या फायद्याविषयी खूप विस्तृत वर्णन करण्यात आलेले आहे.त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.

शरीरातील साखर आणि रक्ताचे प्रमाणही योग्य ते राखले जाते. तसेच पचनाशी निगडित समस्या सुद्धा निर्माण होत नाही. आज आपण धन्याच्या सेवनाचे शरीराला होणारे कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेणार आहोत.धन्याच्या सेवनामुळे त्वचेला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

१) धन्याचे सेवन केल्यामुळे त्वचेला सूज येणे,पुरळ येणे,एक्झिमा यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.त्यामध्ये असलेल्या एंटीसेप्टीक गुणांमुळे त्वचेच्या या समस्यांवर आराम मिळतो.

२) धन्याच्या सेवनामुळे त्वचेचे विकार दूर होण्यासोबतच तोंड येणे किंवा अल्सर सारख्या समस्यांवरही आराम मिळतो कारण यामध्ये थंडावा निर्माण करण्याचे गुणधर्म असतात.

३) धन्या मध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचीही गुणधर्म असतात असे काही संशोधनांमध्ये दिसून आले आहे. धन्याचे पाणी दररोज सेवन केले असता रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते व यामुळे मधुमेहासारख्या समस्यांवर उपाय केला जातो.

४) धन्याचे सेवन हे नियमित तत्वावर केले असता पचनाशी निगडित समस्या दूर होतात.पचनाशी निगडीत असलेले स्नायू मोकळे होण्यास यामुळे मदत होते व त्यामुळे पचन प्रभावीपणे घडून येते.पोटामध्ये होत असलेल्या वेदना धन्यामुळे दूर होतात.यामध्ये काही प्रमाणात असे पदार्थ असतात ज्यामुळे लिव्हर चे कार्य प्रभावीपणे होते व पचन प्रक्रियाही सुलभ होते.

५) धन्याच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाते.धन्याच्या सेवनामुळे गुड कोलेस्ट्रॉल चे प्रमाण शरीरामध्ये वाढते.ज्या व्यक्तींना आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवायचे असते व बॅड कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी करायचे असते त्यांनी आपल्या रोजच्या आहारामध्ये धन्याचे सेवन अवश्य करावे असे सांगितले जाते.

६) धन्याचा उपाय हा मूत्रमार्गाचा संसर्ग साठी खूपच गुणकारी असतो.मूत्रविसर्जनाच्यावेळी जळजळ होणे यांसारख्या समस्यांसाठी पाण्यामध्ये रात्रभर धने भिजत घालावे व हे पाणी गाळून प्यावे यामुळे मुत्र विसर्जन असं होणारी जळजळ दूर होते.

७) मासिक पाळी शी निगडीत समस्या दूर करण्यासाठी सुद्धा धन्याचे आपल्या रोजच्या आहारामध्ये सेवन करावे.धन्याचे सेवन केले असता मासिक पाळीच्या रक्तस्त्रावासाठी कारण असलेल्या हार्मोन्सचे संतुलन धन्याच्या सेवनामुळे नियंत्रण ठेवले जाते.पाळीच्या काळामध्ये स्त्रियांना निर्माण होणाऱ्या पोट फुगणे,स्नायूंमध्ये गोळे येणे यांसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी धन्याचे सेवन अवश्य करावे.ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या अति रक्तस्रावाचा त्रास असतो त्यांनी आपल्या आहारामध्ये धन्याचा समावेश अवश्‍य करावा.यामुळे मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव नियमित पणे योग्य प्रमाणात होण्यास साहाय्य मिळते.