Home » हिवाळ्यात काळ्या तीळाचे सेवन केल्यामुळे मिळतात हे ६ फायदे, ६ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्वाचा
News

हिवाळ्यात काळ्या तीळाचे सेवन केल्यामुळे मिळतात हे ६ फायदे, ६ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्वाचा

मानवी आयुष्य शाश्वत आणि चिरतरुण ठेवण्यासाठी ज्या काही घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक निसर्गाने आपल्या आजुबाजूला अगदी सहजपणे पुरवले आहेत‌. आहार हा आपल्या या आयुष्यातील एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे .आपल्या आहारामध्ये असे अनेक सुपरफुड्स असतात जे आपल्याला निरोगी राखण्यासाठी आणि आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक विविध मार्गांनी मदत करत असतात. अशाच सुपरफुड्स पैकी एक आणि अगदी सहजपणे उपलब्ध होणारा पर्याय म्हणजे काळे तीळ होय.

काळे तीळ अगदी छोटासा बी स्वरूपातील पदार्थ असून अगदी समृद्ध असा स्त्रोत आहे. काळया तीळांमध्ये एंटीऑक्सीडेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. काळे तीळ यामुळे शरीराला मिळणाऱ्या या निरनिराळ्या फायद्यांमुळे संपूर्ण जगभरामध्ये या पदार्थाला खूप जास्त मागणी सध्याच्या काळात निर्माण झाली आहे. काळे तीळ  यांचा वापर जगभरातील विविध पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.काळे तीळ यांचा आपल्या आहारात समावेश का करावा व त्याचे आपल्या शरीराला नक्की काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) काळे तीळ हे प्रथिने ,झिंक,लोह आणि अंटी अक्सिडेंट व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात.काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की काळ्या तिळाच्या तेलाने मालिश केली असता अतिनील किरणांमुळे त्वचेला झालेली हानी 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात भरून येऊ शकते. अतिनील किरणांमुळे त्वचेची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते ‌चेहऱ्यावर सुरकुत्या आणि आणि वयाच्या अगोदरच त्वचा वृद्धत्वाकडे झुकलेल्या दिसू शकते.तिळाच्या तेलामुळे ही सर्व हानी भरून येऊ शकते. तिळाच्या तेला मध्ये असलेल्या विविध पोषक घटकांमुळे काळे तीळ हे केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त मानली जातात .काळे तिळाच्या मालिश मुळे केसांच्या वाढीसाठी चालना मिळते .काळे तीळांच्या या गुणधर्मांमुळे विविध त्वचा आणि केसांशी निगडित उत्पादनांमध्ये काळ्या तीळ यांचा वापर केला जातो‌.

2) काळया तीळ यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. यामुळे त्वचेच्या आतील पेशींची झालेली हानी भरून येऊ शकते. वारंवार निर्माण होणाऱ्या तणावामुळे पेशींची हानी होते व यामुळे मधुमेह ,कॅन्सर ,रक्तदाब यांसारख्या आजारांना आमंत्रण दिले जाते.काळे तीळ  त्यांमध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे शरीरामध्ये अतिरिक्त तणाव निर्माण होऊ दिला जात नाही व परिणामी पेशींची हानी होण्यापासून बचाव केला जातो व हानी झालेल्या पेशींच्या पुनर्भरणासाठी प्रक्रिया सुरू होते. काळया तीळांमुळे हाडांना झालेली अंतर्गत इजा भरून येऊन दुखणे सुद्धा दूर होते.

3) काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की दररोज चार आठवडे इतका कालावधी 2.4 ग्रॅम इतक्या प्रमाणात काळे तीळ यांचे सेवन केले तर रक्तदाब नियंत्रणात राखला जातो .ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाची समस्या आहे त्यांनी हा उपाय अवश्य अवलंबावा.
4) काळे तीळ त्यामध्ये असलेल्या विटामिन बी आणि  या घटकांमुळे कॅन्सर जन्य पेशींना फैलावर होण्यापासून रोखले जाते मात्र या संदर्भात अजून जास्त संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

4) काळे तीळ त्यांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुळे चयापचयाची प्रक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राखले जाते.चयापचयाची प्रक्रिया काळे तीळ यामुळे अगदी सुलभ पद्धतीने होते. तसेच काळे तिळांमध्ये फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात‌. पचनाची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे होण्यासाठी फायबर युक्त पदार्थ सेवन करणे आवश्यक असते व त्यासाठी काळे तीळ हा एक उपयुक्त पर्याय ठरतो.

5) स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी दुधाचे प्रमाण वाढायला काळे तीळ खाणे खूपच फायदेशीर ठरते. काळे तीळांमध्ये मॅग्नेशिअम, झिंक, फायबर आणि खुप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे हे सर्व पोषक घटक दुधा द्वारे अर्भकाच्या शरीरात जातात व त्याच्या वाढीस मदत करतात.

6) काळे तीळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते .या घटकांमुळे सेरोटोनिन हे संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्रवते जे मानसिक स्वास्थ्य व निरोगी मानसिक स्थितीशी निगडित असते. काळे तीळ यांचे सेवन केल्यामुळे मूड चांगला बनतो.