Home » जाणून घ्या ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे…
Food & Drinks

जाणून घ्या ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

शास्त्रामध्ये ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे.ताक हे शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढून शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर शक्तिशाली होते.विषेश म्हणजे तीन दिवस काहीही न खाता ताक पीत राहील्यास आपल्या शरीराचे पंचकर्म होते आणि शरीरातील चरबी निघून जाते इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा टवटवीत व तेजस्वी होतो.

ताकामध्ये विटॅमिन B-१२,कैल्शियम,पोटॅशियम आणि फॉस्फोरस सारखे घटक असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात.पोट साफ होत नसल्यास किंवा पोटातून आवाज येत असल्यास ताक पिल्याने हे आजार नाहीसे होतात.ताक पिल्याने शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता कमी होते.साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

तर आज आपण ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे बघणार आहोत… 

१) शरीर थंड राहते : ताक थंड असल्यामुळे ताक पिल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.एक ग्लास ताकात जिरे पावडर,पुदिना,कोथिंबीर आणि मीठ मिसळून पिल्याने तहान लगेच भागते.उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होते.

२) पचनशक्ती सुधारते : ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे.ताकामध्ये शरीरासाठी उत्तम असनारे बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक एसिड असते.ज्यामुळे आतड्यांना आराम मिळतो आणि पचनशक्ती वाढते.ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते.कारण ताकामुळे आतड्यांचे कार्य सुरळीत होते.अपचन आणि पोटाच्या समस्याअसतील तर कित्येकदा ताक पिण्याचा सल्ला देतात.ताकपिल्यामुळे अन्नामधुन झालेले पोटाचे इनफेक्शन अथवा फूड पॉईझनिंगचा त्रास कमी होतो.

३) हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीसाठी : दह्यापासून ताक बनवले जाते.ताकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.एक कप ताकामध्ये जवळ जवळ शंभर मिग्रॅ कॅल्शिअम असतात.हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीसाठी शरीराला सतत कॅल्शिअमची गरज असते.कारण कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात.जे लोक नियमित ताक पितात त्यांना हाडांच्या आणि दातांच्या संबंधित असणारे आजार कमी प्रमाणात होतात.हाडे आणि दातांप्रमाणेच रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी,स्नायू मजबूत होण्यासाठी आणि ह्रदयाची स्पंदने व्यवस्थित राहण्यासाठी शरीराला कॅल्शिअमची गरज असते.ताकामधून शरीराला लागणारा कॅल्शिअमचा पूरवठा होतो.

४) रक्तदाब नियंत्रणात राहतो : आजकाल धावपळीच्या जीवनात कामाची दगदग,चिंता, काळजी याचा परिणाम आरोग्यावर होतांना दिसत आहे.मानसिक ताणतञावामुळे रक्तदाब वाढतो आणि हायपरटेंशन,ह्रदयविकाराच्या समस्या वाढू लागतात.मात्र दररोज नियमित ताक पिल्याने असाल रक्तदाब कमी होतो. कारण ताकामध्ये असणाऱ्या पोटॅशियम मुळे रक्तदाब नियंत्रित राहते.यासाठीच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी आहारामध्ये नियमित ताकाचे सेवन करायला पाहिजे.

५) ताक हे प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे चांगले स्त्रोत आहे तसेच ताकामध्ये कॅलरिज आणि फॅट्स कमी असतात.ताक पिण्यामुळे पोट भरल्यासारखे राहते.शिवाय त्यामुळे तुम्हाला हायड्रेटेड आणि उत्साही वाटू लागते.ज्यामुळे तुम्ही दिवसभरात अनावश्यक पदार्थ कमी प्रमाणात खाता.ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी डाएटमध्ये ताकाचा  समावेश करावा कारण ताकामुळे वजन कमी होते.

६) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते : शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ह्रदयावर ताण पडतो त्यामुळे ह्रदयविकार होतात.परंतु नियमित ताकामध्ये पिल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.ज्यामुळे ह्रदयविकारांचा धोका टळतो.ह्रदय निरोगी राहण्यासाठीनियमित एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरते.

७) डोळ्यांसाठी फायदेशीर : डोळ्यामधील लालसरपणा,जळजळ होणे किंवा डोळ्यांना खाज येणे यासारख्या समस्या सर्वसामान्य आहेत.या समस्येवर मात करण्यासाठी ताक एक रामबाण उपाय आहे. दररोज नियमितपणे ताकामध्ये पिल्यास या समस्या पासुन आराम मिळतो.