Home » ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या ‘या’ भाजीचे ६ महत्वाचे फायदे…
Uncategorized

‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या ‘या’ भाजीचे ६ महत्वाचे फायदे…

कंटुले भारतातील डोंगराळ  भागात उगवणारी वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.या भाजी चा जीवन काळ ३ ते ४ महिने असतो.पावसाळा सुरु होताच बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या येतात यामध्ये एक म्हणजे कंटुले.पावसाळ्यात येणारी हि भाजी खूप फायदेशीर मानली जाते.हि भाजी सर्वात शक्तिशाली भाजी मानली जाते.त्याच बरोबर हि भाजी खूप पौष्टीक मानली जाते. या भाजीला खूप साऱ्या नावाने ओळखतात.जसे कि करटोली,कंटोली.

या भाजीचा उपयोग औषधी बनवण्यासाठी देखील होतो.आयुर्वेद मध्ये या भाजीला खूप गुणकारी आणि निरोगी भाजी मानली जाते.हि भाजी प्रोटीनयुक्त आहे.या भाजीमध्ये  प्रोटीन आणि लोह भरपूर  प्रमाणात आढळले जाते.तसेच वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.कारल्यासारखे दिसणारे पण आकाराने लहान असणारे फळ याची आपण भाजी देखील करू शकतो.बाजारामध्ये या भाजीला खूप मागणी आहे.१०० ते २०० रुपये प्रतिकिलो विकली जाते.कंटोल्याची मागणी लक्षात घेऊन जगभरात याची शेती करण्यात आली आहे. 

तर या भाजी पासून शरीरासाठी होणारे फायदे जाणून घेवूया… 

१) अन्न पचन होण्यासाठी खूप फायदेशीर आहे.कंटुल्याचा रस करून पिल्याने व्यवस्थित पचन होते.याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.  

२) पोटाच्या विविध विकारासाठी देखील खूप उपयोगी आहे.आणि वजन कमी करण्यासाठी कंटुल्याची भाजी एक उत्तम उपाय आहे  

३) आयुर्वेदात अनेक आजारांवर याचा औषधी म्हणूनही उपयोग केला जातो.कंटोल्यात केरोटेनॉइड्सचे प्रमाण असते त्यामुळे हि भाजी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.यामुळे द्रुष्टी तेज होते. 

४) कंटोल्यात असणारे मोमोरडीसीन तत्व अँटिऑक्सिडंट,अँटिडायबिटीज आणि ऍन्टीस्ट्रेसचे काम करते.शरीरातील रक्तदाब (ब्लड शुगर) कमी करण्यासाठी देखील फायदेयुक्त आहे. 

५) बदलत्या वातावरणामुळे सर्दी,खोकला आणि ताप या सारखे आजार होतात. ह्या भाजीमध्ये एन्टी-एलर्जिक आणि एनाल्जेसिक गुण असतात.त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी हि भाजी अतिशय उपयुक्त आहे.

६) तसेच नेत्ररोग,कर्करोग आणि हृदयरोग या सारख्या आजारासाठी देखील हि भाजी खूप फायदेशीर आहे.