Home » आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ‘डोंगराची काळी मैना’ म्हणजेच ‘करवंद’…!
Food & Drinks

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे ‘डोंगराची काळी मैना’ म्हणजेच ‘करवंद’…!

सध्या उन्हाळ्याचा मौसम चालू आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराची लाहीलाही होते. उष्णता कमी करण्यासाठी विविध प्रकारची थंड पेय आणि फळांचे सेवन केले जाते. फळांचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची रेलचेल आपल्याला दिसून येते. यांपैकी काही फळांचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. असेच एक फळ म्हणजे  करवंद होय. करवंदाला  डोंगरची काळी मैना म्हटले जाते .करवंदाच्या सेवनामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

  1. करवंदाची चव आंबट असते.करवंदांचे सेवन ज्यूस जॅमच्या स्वरूपातही केले जाऊ शकते. करवंद केवळ चवीसाठी नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर ठरतात. करवंदामध्ये अँटिबायोटिक गुण आहे.
  2. करवंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व प्रथिने असतात. करवंदामुळे दातांचे आरोग्य चांगले राखले जाते. हिरड्यांच्या वेदनाही करवंदांच्या सेवनामुळे दूर होतात.तोंडाला येणारी दुर्गंधी सुद़्धा करवंदाच्या सेवनामुळे दूर केली जाऊ शकते.
  3. तुम्ही जर पोटाच्या समस्यांनी हैराण असाल तर करवंदाचे सेवन अवश्य केले पाहिजे.करवंदाचे सेवन केल्यामुळे पोटाशी निगडित अपचन ,बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात तसेच जुलाबाचा त्रास होत असेल तरीही करवंदाचे सेवन केल्यास आराम मिळतो.
  4. वजन कमी करण्यासाठी करवंद अतिशय चांगला पर्याय आहे. करवंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे करवंदाचे सेवन केल्यानंतर खूप काळ भूक लागत नाही व यामुळे अतिरिक्त खाण्यास आळा बसतो.
  5. करवंदं मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे हृदयाचे आरोग्य सुद्धा चांगले राखले जाते कारण करवंदांच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.