Home » ‘हे’ आहेत मिठाचे औषधीय गुणधर्म, जे तुम्हालाही माहित नसेल…!
Food & Drinks

‘हे’ आहेत मिठाचे औषधीय गुणधर्म, जे तुम्हालाही माहित नसेल…!

आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोणत्याही पदार्थाला चव येण्यासाठी मिठाची खूप आवश्यकता असते.एखादा पदार्थ कितीही महागडे घटक वापरून बनवला तरीही त्यामध्ये मीठ वापरल्याशिवाय चव येत नाही.एखाद्याशी इमान राखण्याचे प्रतीक म्हणून मीठाचा संबोधले जाते म्हणूनच ज्याचे मीठ खाल्ले त्याच्याशी कपाट करू नये असे म्हटले जाते किंवा नावडतीचे मीठ आळणी अशा म्हणी सुद्धा मिठा संदर्भात प्रचलित आहेत.मिठाचे केवळ आहारातील चवी विषयक फायदे नसून आपल्या आरोग्याशी निगडित सुद्धा अनेक फायदे आहेत.आज आपण मिठाचे आपल्या आरोग्यासाठी असलेले औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत.

१) तुम्हाला जीभेवर व तोंडा मध्ये बारीक पूरळ संसर्ग होण्याची समस्या उद्भवली असेल तर अशावेळी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर निश्चितच आराम मिळतो.अर्धा कप पाण्यामध्ये मीठ मिसळून याद्वारे मिठाच्या गुळण्या मारल्या तर तोंडातील पुरळ कमी होते हा उपाय दिवसातून दोन-तीन वेळा करावा.

२) नखांची अंतर्गत वाढ होऊन याचा संसर्ग बोटालाही होतो यामुळे नख व बोटाचा भाग सुजणे, जखम होणे इत्यादी त्रास उद्भवतात अशावेळी कोमट पाण्यामध्ये मीठ घालून हा भाग पाण्यामध्ये बुडवून ठेवला तर आराम मिळतो मात्र या व्यतिरिक्त डॉक्टरांचे उपाय सुद्धा या स्थितीसाठी घेणे आवश्यक असते .डॉक्टरांकडून योग्य ते मलम  ही स्थिती सुधारण्यासाठी वापरावे.

३) पोटामध्ये होणाऱ्या जंतांचा त्रास दूर करण्यासाठी बारीक मिठाला ताकामध्ये टाकून घेतले असता काही दिवसांमध्ये हा त्रास दूर होतो.

४) मिठामध्ये असलेल्या आयोडीन या घटकामुळे थायरॉईडच्या निर्मितीस बाधा होते. थायरॉईडच्या संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये जर काही अडथळा येत असेल तर यामुळे हायपरथायराईडसारख्या समस्या निर्माण होतात. आयोडीन हा घटक गर्भावस्थेमध्ये खूप आवश्यक असतो.गर्भातील बाळाची व जन्मल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे लहान मुलांच्या मेंदूची वाढ होत असते.ज्या महिलांना गर्भारपणात आयोडीनची कमतरता जाणवते त्यांच्या मुलांना स्मरणशक्ती किंवा विकासाशी निगडित काही समस्या उद्भवू शकतात.

५) उष्माघाताचा झटका बसल्यास मनुष्याच्या विविध महत्त्वपूर्ण अवयवांना इजा पोहोचू शकते.उन्हामध्ये जास्त वावरल्यामुळे किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या अतिउष्णतेमुळे उष्माघात होऊ शकतो.अशा वेळी आपले शरीर घामाद्वारे शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करते.जर शरीरामध्ये योग्य प्रमाणात मीठ नसेल तर हे कार्य सुरळीत पणे चालू शकत नाही.

६) स्नायूंमध्ये पेटके येण्याची समस्या अनेकदा निर्माण होते.अतिरिक्त मद्यपान,व्यायाम किंवा विशिष्ट प्रकारच्या औषधोपचार यामुळे स्नायूंमध्ये पेटके येतात.यासाठी मीठ असलेल्या द्रव्य पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

७) गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये पाय बूडवून बसले असता पायावर आलेली सूज व वेदना कमी होतात.मिठाच्या वापराने त्वचेवरील मृ’तपेशी दूर केल्या जाऊ शकतात व त्वचेला चकाकी प्राप्त करून दिले जाऊ शकते.

८) मिठामध्ये असलेल्या पोटॅशियम या घटकांमुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो.मधमाशी किंवा अन्य जीवजंतू नी डंख  केल्यामुळे त्या ठिकाणी आग होत असेल तर मीठ रगडले असता वेदना कमी होतात व सूजही कमी होते.

९) दिवसभर काम केल्यानंतर डोळ्यांवर ताण येत असतो. अशावेळी अर्धा कप पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून या पाण्यामध्ये कापडाची पट्टी बुडवून डोळ्यावर ठेवले तर आराम पडतो.

१०) डोकेदुखीचा त्रासवरही मीठ गुणकारी उपाय ठरतो.यासाठी डोकेदुखीचा त्रास होत आहे त्यांनी आपल्या जीभेवर मीठ घ्यावे व दहा मिनिटानंतर पाणी प्यावे त्यामुळे डोकेदुखीचा त्रास दूर होतो.