Home » जर्दाळूचे सेवन केल्याचे हे आहेत फायदे…
Food & Drinks

जर्दाळूचे सेवन केल्याचे हे आहेत फायदे…

आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकांना लठ्ठपणा च्या समस्या आहे.वाढलेले वजन ही आज प्रत्येकाची समस्या आहे.स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक जण जिम लावतात, योगा करतात,वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज आणि डाएट्स करतांना आपल्याला दिसून येतात.योग आणि व्यायाम हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.पण डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे योग्य नाही त्यामुळे अनेकदा शरीर आजारी पडते.त्याऐवजी योग्य आहार घेतल्याने वजन आटोक्यात राहतं.शिवाय काही पदार्थांमुळे वजन कमी करता येते. 

फळेभाज्या आणि योग्य आहार असल्यास चांगल्या वजन कमी करता येते.त्यापैकी एक म्हणजे जर्दाळू इंग्लिश मध्ये ड्राईड अप्रिकोट आणि हिंदीमध्ये खुबानी म्हणतात.जर्दाळू हे फळ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.जर्दाळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स,मिनरल्स आणि इतर पोषक तत्व आहेत.फायबरचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणजे जर्दाळू.फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर्दाळू खाल्ल्याने वजन कमी होते आणि गॅस्ट्रिक आजारांपासून बचाव होतो.

चला तर मग जाणून घेऊया जर्दाळूचे फायदे… 

१) पचनशक्ती सुधारते : शरीरातील पचनशक्ती जर चांगली नसेल तर लठ्ठपणा वाढतो.यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली पचनक्रिया योग्य असणे.जर्दाळू एक असं फळ आहे की ज्यात इतर फळांच्या तुलनेत फायबर मोठ्या प्रमाणात आहे.नियमित जर्दाळू खाल्ल्याने आपली पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि त्यामुळे वजन वाढत नाही.

२) त्वचेसाठी उपयुक्त : त्वचेसंबंधित असणाऱ्या समस्यांवर जसे की ड्राय स्कीन असणे,खाज येणे,पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी जर्दाळू अत्यंत फायदेशीर आहे.तसेच जर्दाळूचा वापर हा सुरकुत्यापासून सुटका करण्यासाठी देखील होतो.जर्दाळूचे तेल त्वचेचसाठी खूप गुणकारी आहे.हे तेल त्वचेत लवकर शोषले जाते आणि हे लावल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही.

३) रक्त शुध्दीकरणासाठी फायदेशीर : शरीर आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे.जर्दाळुमध्ये लोहत असल्यामुळे अशक्तपणापासून बचाव करते आणि अशक्तपणामुळे होणा इतर आजारांपासून दुर ठेवते.जर्दाळूच्या सेवनामुळे रक्तप्रवाहाची गती वाढते आणि रक्त शुध्दीकरणासाठी फायदेशीर आहे. 

४) हृदयरोगासाठी फायदेशीर आहे: उच्च फायबर रेट हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.जर्दाळुचे सेवन कखराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयरोग दूर करते. पोटॅशियमच्या उच्च सामग्रीबद्दल धन्यवाद, ते हृदयाच्या स्नायूंना मजबूत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

५) संशोधनानुसार सिध्द झाले आहे की जर्दाळूला रंग देणारे रंगद्रव्य डोळ्याच्या आरोग्यास सुरक्षित ठेवण्यास मदत करते. हे व्हिटॅमिन ए, सी आणि ई समृद्ध आहे ज्यामुळे दृष्टीच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.मोतीबिंदू होण्याचा धोका कमी करते.दिवसातुन 2-3 जर्दाळू सेवन केल्यामुळे व्यक्तींमध्ये वय-संबंधित मॅक्युलर र्हास होण्याचा धोका कमी होतो.

६) हाडे मजबूत होतात : हाडांचे आरोग्य सुधारते जर्दाळूमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांच्या विकास आणि आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.विशेष म्हणजे,योग्य शोषण आणि कॅल्शियम वितरणासाठी पोटॅशियम देखील महत्वाचे आहे आणि जर्दाळू देखील पोटॅशियम समृद्ध असतात.