Home » आपल्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ प्रोटीनयुक्त आहे…
Food & Drinks

आपल्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ प्रोटीनयुक्त आहे…

तर आपण पहिले प्रोटिन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया प्रत्येक सजीवाला प्रथिने अति आवश्यक आहे. सजीवाच्या शरीरातील महत्त्वाचा मूलघटक म्हणजे प्रथिने. प्रोटीन हा ग्रीक शब्द आहे. प्रथिने या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रथम क्रमांक मिळवणारा.या वरून प्रथिनांचे महत्व समजून येते. कार्बन,हायड्रोजन,ऑक्सिजन आणि नायट्रोजन या पासून प्रोटीन बनलेले असते. मानवी शरीरात २० प्रोटीन असतात त्यापैकी १० प्रोटीन स्वतः शरीर बनवत आणि १० प्रोटीन आपल्या आहारातून तयार होतात. दररोज सामान्य व्यक्तीला ५६ ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते. आणि सामान्य महिलेला ४० ग्रॅम प्रोटिन्सची आवश्यकता असते.तर आज आपण आपल्या दररोजच्या आहारात कोणते पदार्थ प्रोटीन युक्त आहे हे बघूया….  

१) सोयाबीन : सोयाबीन हा एक प्रोटीनयुक्त पदार्थ आहे.  सोयाबीन मटण आणि अंडी पेक्षा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. सोयाबीनचे सेवन केल्याने हाडांच्या कमजोरी पासून आराम मिळतो. सोयाबीनच्या सेवनाने आरोग्य चांगले राहते. तसेच वजन आणि चरबी कमी होण्यास देखील मदत होते. सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वात जास्त असते.त्यामुळे आपण सोयाबीनचा नियमितपणे आहारामध्ये वापर केला पाहिजे. 

२) बादाम : बादाम मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.चार/पाच बादाम रात्री पाण्यात किंवा दुधात भिजत घालावेत आणि सकाळी उपाशीपोटी खावेत.                                                       

३) दुध : पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला खूप महत्व दिले जाते.दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

४) पनीर : दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जे आपल्या शरीरातील कॅल्शिअम आणि प्रोटिन्सची कमी पूर्ण होते. 

५) दही : दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते तसेच हाड मजबूत होतात. दातांसाठी आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी दही अत्यंत फायदेशीर आहे. दही हे प्रोटिन्स साठी सर्वात चांगलं साधन आहे. रोज दह्याचे सेवन केले तर आरोग्य निरोगी राहते. १०० ग्रॅम दह्यामध्ये १० ग्राम प्रोटिन्स असते. 

६) डाळ : सर्व प्रकारच्या डाळीमध्ये प्रोटीन असते.सर्व प्रकारच्या डाळीमध्ये प्रोटीन असते. परंतु मसूरच्या डाळीला प्रोटीनचा सोर्स मानतात.मसूर डाळीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आणि वजन कमी होण्यास देखील मदत 

होते.त्यामुळे मसूरच्या डाळीचे जेवणात नियमितपणे सेवन केले पाहिजे. मसूर डाळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

७) ब्रोकोली : ब्रोकोली मध्ये सुध्दा प्रोटीन चे प्रमाण जास्त आहे. ब्रोकोली चा उपयोग आपण सॅलेड मध्ये केला जातो.ब्रोकोली फिटनेस साठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण ब्रोकोलीचा सॅलेड,पराठा,सूप,सॅन्डविच मध्ये सुध्दा वापर करू शकतो.                             

८) ओट्स : ओट्स चा वापर पण नाश्त्याच्या  वेळी करू शकतो. तसेच ओट्स आणि दूध मिक्स करून सुद्धा आपण खाऊ शकतो. तसेच ओट्स चा उपमा किंवा डोसा करून खाऊ शकतो.ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत.ओट्स खाल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. 

९) चीज : चीज हा पदार्थ देखील दूध पासून बनलेला आहे. चीज मध्ये पण प्रोटीन चे प्रमाण जास्त असते.                

१०) अंडी : एका अंड्यात ६ ग्रॅम प्रोटीन असते. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये जास्त प्रोटीन असत आणि पिवळ्या भागात फॅटचे प्रमाण असते. पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.