Home » उभा राहून पाणी पिल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम…
Uncategorized

उभा राहून पाणी पिल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम…

अनेक वेळा आपण घरात आई किंवा आजीचे बोलणे खाल्ले असतील आणि त्याचे कारण म्हणजे उभा राहून पाणी पिणे.पाणी उभा राहून प्यावे कि बसून याबाबत लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे. नेमकं आपल्या आरोग्यासाठी चांगल काय.उभा राहून पाणी पिने कि बसून हा महत्वाचा मुद्दा आहे.उभा राहून पाणी पिने हे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे अनेक जणांना पाणी उभ्यानेच प्यायची सवय लागते.आणि ती आपल्या शरीरासाठी घातक आहे.तर उभा राहून पाणी पिल्याने आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया… 

१) किडनीचे विकार : आपल्या शरीरात पाण्याला स्वछ करण्याचे काम किडनी करते.आपण जर उभा राहून पाणी पिलो तर किडनी मधून ते पाणी स्वछ न होता वाहून जाते.जर अशीच क्रिया सुरु राहिली तर काही काळानुसार मूत्राशय,हृदय आणि किडनी या संबंधित आजार होऊ शकतात. 

२) अपचन होणे : उभ्याने पाणी पिल्यामुळे पाणी अन्ननलिकेद्वारे पोटामध्ये जाते.त्यामुळे अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब पडतो.त्यामुळे उभा राहून पाणी पिल्यामुळे पचनक्रिया मध्ये समस्या निर्माण होतात.आणि पचन यासंबंधीचे आजार होतात.त्याऐवजी खाली बसून पाणी पिले तर स्थायूंवर आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण पडणार नाही. त्यामुळे पाण्याबरोबर इतर पदार्थ ही पचन होण्यास मदत होईल. 

३) त्वचेवर तेज येते : शरीरात पुरेसे पाणी असेल तर कोणताही त्वचारोग होण्याची शक्यता कमी होते.जेव्हा आपण बसून पाणी पितो तेव्हा शरीराची पाण्याची गरज पूर्ण होते.यामुळे आपली त्वचा उजळते.त्यामुळे जेव्हा पाणी प्यायचे असेल तेव्हा खाली बसून प्यावे उभा राहून पिऊ नये. 

४) फुप्फुसांचे विकार : उभा राहून पाणी पिल्याने आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो.अन्ननलिकेला आणि श्वसननलिकेला मिळणारा प्राणवायूचा पुरवठा बंद होऊ शकतो.त्यामुळे बसून पाणी प्यावे.फुफ्फुसे निरोगी राहतील. 

५) सांधेदुखी आणि गुडघेदुखी : उभा राहून पाणी पिल्याने सांधिवात या सारखे आजार होऊ शकतात.कारण उभा राहून पाणी पिल्याने सांध्यामधील द्रव पदार्थांची कमी भासू लागते.त्यामुळे सांधेदुखी आणि गुडघेदुखी चा त्रास जाणवू लागतो.तसेच अर्थरायटिस सारखे आजार निर्माण होतात. 

६) अपूर्ण तहान : उभा राहून पाणी पिल्याने तहान भागात नाही.पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते.आयुर्वेदामध्ये सांगितले आहे कि आपण जसे जेवण बसून करतो तसेच पाणी पण बसूनच प्यायला पाहिजे. 

पाणी पिण्याच्या योग्य पद्धती खालीलप्रमाणे आहे…. 

१) जेवणानंतर ४० ते ४५ मिनिटानंतर पाणी पिले तर आपली पचनशक्ती चांगल काम करते. 

२) अंघोळीनंतर थोड्या वेळाने पाणी पिल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. 

३) झोपण्याच्या अगोदर पाणी पिले तर हृदयविकाराच्या समस्या कमी होतात. 

४) सकाळी उठल्या बरोबर गुळना करून माठातील १ ते २ ग्लास पाणी पिल्याने पोटाचे आजार कमी होतात. 

५) बाहेरून उन्हातून घरात आल्यावर लगेच पाणी पिऊ नये थोड्या वेळानंतर प्यावे.