Home » बापरे!! या टी स्टॉलवर एक कप चहाची किमंत आहे १००० रुपये…जाणुन घेऊया काय आहे ह्या चहाची खासियत…
Food & Drinks

बापरे!! या टी स्टॉलवर एक कप चहाची किमंत आहे १००० रुपये…जाणुन घेऊया काय आहे ह्या चहाची खासियत…

खुप जणांना नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते.परंतु व्यवसाय सुरु करायचा म्हंटले की व्यवसाय चालला पाहिजे जेव्हा आपली कल्पना चांगली असेल तेव्हा व्यवसाय व्यवस्थित चालतो.आपण कित्येकदा चहाचे स्टॉल बघतो तिथे आपल्याला जास्तीत-जास्त दोन तीन प्रकारच्या चहा बघायला मिळतात.परंतु कोलकत्त्यामधील मुकुंदर या गावातील हा तरुण चक्क १०० प्रकारच्या चहा विकतो.

एका छोट्या चहाच्या स्टॉलवर तुम्ही एका कप चहासाठी जास्तीत जास्त १० ते १२ रुपये दिले असेल नाहीतर जास्तीतजास्त १५.परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोलकत्त्यात एका लहान स्टॉलमध्ये चहाच्या कपसाठी लोकांना १००० रुपये मोजावे लागतात.

कोलकत्ता येथील पार्थ प्रतिम गांगुलीने २०१४ मध्ये मुकुंदपूर येथे आपला चहा स्टोअर निर्जश लॉन्च केला आणि १२ रुपया पासुन ते १ हजार रुपयापर्यंत विविध प्रकारच्या चहाची विक्री करतो.पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथील निर्जश हा अतिशय लोकप्रिय चहाचा स्टॉल आहे.

हा चहा खूप अनोखा आहे.. 

प्रति कप १००० रुपयांचा हा चहा अगदी अनोखा आहे.या छोट्या चहाच्या स्टॉलवर १०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या अनोख्या चहा बनविल्या जातात.सोशल मीडियाच्या वृत्तानुसार,येथे चहा १२ रुपये कप पासून सुरू होतो आणि प्रति कप १००० रुपयांपर्यंत जातो.या स्टॉलवर ब्रो-ले चहाची  किंमत प्रति किलो तीन लाख रुपये आहे.

इथल्या चहाच्या इतर प्रकारांमध्ये सिल्वर सुई व्हाईट-टी, लव्हेंडर-टी, हिबिस्कस-टी, व्हिन-टी, तुळशी आल्याची चहा,ब्लू टियान-टी,तीस्ता व्हॅली-टी,मकाबारी-टी,रुईबॉस-टी आणि ओक्टी-टी आहे.प्रत्येक चहाचे एक वेगळे वैशिष्ट्ये आणि चव आहे.या स्टॉलवर दुरदूरचे लोक चहा पिण्यासाठी येतात.

पूर्वी खाजगी कंपनी मध्ये काम करायचा…

तुम्हाला माहीत आहे का या स्टॉलचा मालक सात वर्षांपूर्वी पार्थ प्रतिम गांगुली एका कंपनीत काम करत होता आणि त्याबरोबर पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला होता.तथापि, नंतर त्याने आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्या वेळी पार्थच्या डोक्यात चहाचे दुकान सुरू करण्याची कल्पना आली आणि त्याने हे स्टॉल उभारले.विषेश म्हणजे चहा बरोबर चहा पिण्याचे फायदे देखील त्याने सांगितले आहेत.यामुळे त्याची कमाई लाखोंने होत आहे त्याचबरोबर तो जगभरात प्रसिद्ध होत आहे.

हे दुकान 2014 मध्ये उघडले गेले होते

या दुकानाच्या मालकाचे नाव पार्थ प्रतिमा गांगुली आहे ज्याने २०१४ मध्ये हे दुकान उघडले होते. पार्थ सुरुवातीला कंपनी मध्ये काम करायचा पण नंतर त्याने नोकरी सोडून आपले आवडते काम म्हणजेच चहाचे काम करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्याच्या चहाने आजूबाजूच्या भागात आपली ओळख निर्माण करण्यास सुरवात केली आणि देशभरात प्रसिद्ध झाले आहे.