Home » नियमित केळी खाणे आरोग्यासाठी ठरते लाभदायक…
Food & Drinks

नियमित केळी खाणे आरोग्यासाठी ठरते लाभदायक…

पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये केळीला खुप महत्त्व दिले जाते.तसेच आयुर्वेदामध्ये देखील केळीला महत्त्व दिले जाते.केळी,केळीची पाने आणि केळीच्या खोडाचा धार्मिक विधीसाठी उपयोग केला जातो हे सर्वांना माहितच आहे.उपवास असेल किंवा डाएट केळी हे सर्वांच्या आवडीचे फळ आहे.

सगळ्यांना परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळी अतिशय लोकप्रिय फळ आहे.घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो किंवा सॅन केळीला महत्त्वाचे स्थान दिले जाते.फळे खातांना प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की कोणते फळ खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

केळी आणि दुध एकत्र करून खुप जणांना खायला आवडते त्यालाच आपण शिकरण असे म्हणतो.अनेक जण वजन वाढवण्यासाठी देखील केळीचे सेवन करतात.केळी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.केळी हे असे फळ आहे जे बारामाही बाजारात उपलब्ध असते.केळी हे आरोग्यदायी आणि बलशाली फळ आहे.केळी हे फळ अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे.

केळीचे वेगवेगळे उपयोग आहे.केळीच्या सालीचा उपयोग कंपोष्ट खतामध्ये केला जातो.वाळलेल्या केळीच्या सालीमध्ये टॅनीन नावाचा घटक असतो ज्याचा उपयोग लेदरला काळा रंग देण्यासाठी होतो आणि केळीच्या खोडाचा उपयोग चटई,कागद आणि दोरी बनवण्यासाठी होतो.

केळी तर सगळेच खातात पण केळी खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे तर आज आपण केळी खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात ते बघणार आहोत…

१) रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी : फायबर शरीरातील रक्त पातळी नियंत्रणात ठेवते आणि चरबीयुक्त पदार्थापासून मुक्तता देते.रक्तदाब चा त्रास असल्यास किंवा थकवा जाणवत असेल तर केळ्यांचे सेवन करा.केळामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

२) हाडे मजबुत राहतात : नियमित केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.केळातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेतात त्यामुळे हाडे मजबूत होतात.केळीमध्ये असणारे आयर्न एनेमिया पासून बचाव करते.वजन कमी करण्यासाठी देखील केळी एक रामबाण उपाय आहे. 

३) हिमोग्लोबिन वाढते : केळीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर आहे.अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास केळीचे सेवन करावे.केळी खाल्याने पाळी मध्ये होणाऱ्या पोटदुखी पासून आराम मिळतो.

४) किडनी संबंधित समस्यापासून आराम : किडनी संबंधित काही समस्या असतील तर नियमित पणे केळी खावी.पोटॅशिअम मुले रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मूत्रपिंड देखील निरोगी राहते.केळीमध्ये पोटॅशिअम असल्यामुळे केळी या आजारांसाठी फायदेशीर ठरते.त्यामुळे नियमित आहारामध्ये केळीचे सेवन करावे.

५) मन प्रसन्न राहते : केळी मधील मुड एलिव्हेटींग ब्रेन न्यूरोट्रान्समिटर जे डिप्रेशनवर मात करते आणि स्मृती वाढवण्यास मदत करते.केळीमध्ये मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन-बी 6 असल्यामुळे स्नायूंना आराम भेटतो आणि चांगली झोप लागते.नियमितपणे एक केळी खाल्ल्यास तणाव मुक्त आरोग्य राहते.

६) हृदय निरोगी राहते : केळीमध्ये असणारे पोटॅशियम हृदय निरोगी राहण्यासाठी केळी फायदेशीर ठरते.त्यामुळे दररोज केळीचे सेवन करावे हृदय निरोगी राहते आणि तसेच मधुमेहाचा त्रास असेल तर केळी खावी.मधुमेह नियंनत्रणात राहतो.