Home » लवंग खाण्याचे असे काही फायदे जे तुम्हालाही माहित नसेल…
Food & Drinks

लवंग खाण्याचे असे काही फायदे जे तुम्हालाही माहित नसेल…

आकाराने लहान असणारी लवंग खाण्याचे विविध चमत्कारी फायदे आहेत.पुरातन काळापासून लवंगेचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो.यामध्ये असे औषधी गुणधर्म आहेत जे शरीरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.खर तर याचा जास्तीत जास्त उपयोग हा जेवणामध्ये आणि सर्दी-खोकला यावर केला जातो.तसेच  लवंग आणि लवंग तेलाचे देखील अनेक फायदे आहेत.लवंग फायदे नक्की काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. कदाचित याबाबत बऱ्याच जणांना  माहीत नसेल त्यामुळे या गोष्टीची अधिक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लवंग ही औषधी असून लवंग खाण्याचे फायदे काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया… 

१) अल्सरवर उपायकारक : काही संशोधनानुसार असे सूचित करण्यात आले की लवंगामध्ये आढळणारी संयुगे पोटातील अल्सरवर उपचार म्हणुन फायदे युक्त आहे.

पेप्टिक अल्सर म्हणजे पोटातील वेदनादायी फोड यामुळे पोटात प्रचंड वेदना होतात व पोटात रक्तस्त्राव देखील होतो.यावर लवंग रामबाण उपाय आहे.

२) हाडांच्या मजबुतीसाठी : कमकुवत आणि ठीसूळ झालेली हाडे,सांधीवातची लक्षणे जगभरात हा आजार लोकांमध्ये सामान्य झाला आहे असे आजार दुर करण्यासाठी लवंग खाणे उपयुक्त ठरते.मॅंगनीज हे खनिज हाडांच्या निर्मितीसाठी फायदेशीर आहे त्यामुळे लवंग खाणे फायदेशीर आहे.

३) दातदुखी साठी फायदेशीर : लवंगामध्ये असणारे गुणधर्म दातातील कीड घालवण्यासाठी उपयोगी ठरते आणि दाढ दुखीपासून आराम मिळतो.दातांची निगा राखण्यासाठी लवंगचा वापर पारंपरिक आयुर्वेदीक उपचारासाठी केला जातो.

४) डोकेदुखी वर उपायकारक : लवंग खाल्ल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.यासाठी लवंगची पावडर बनवून घ्यावी आणि ही पावडर दुधात मिसळून हे मिश्रण घ्यावे लवंगातील गुणधर्म यावर परिणामकारक ठरते.तसेच सर्दी खोकला कमी करण्यासाठी देखील लवंग चा वापर केला जातो.

५) ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त : लवंगमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स असतात जे तणाव नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरते.संशोधनानुसार लवंगमध्ये अँटिस्ट्रेस ऍक्टिव्हिटी तणाव कमी करणारे गुण आढळतात.त्यामुळे लवंगमुळे तणाव कमी होतो.लवंग तेलामध्ये मानसिक थकवा कमी करण्याची ताकद आहे यामुळे चिंता कमी होते आणि आराम मिळतो. 

६) पचन होण्यासाठी उपयुक्त : लवंग शरीरातील एंजाइम्सना उत्तेजित करून पचनक्रिया चालना देण्याचे काम करते.लवंगाचे सेवन आतड्यात होणाऱ्या जळजळ कमी करून अपचनाची समस्या कमी करण्याचे काम करते.पोट फुगणे,गॅस,अपचन,मळमळणे,डायरिया आणि उलटी यासारख्या आजारांपासून सुटका मिळण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर आहे. ज्यांना अपचानाची समस्या आहे त्यांना लवंगेत एक चमचा मध घालून रात्री झोपण्यापूर्वी खावे.

७) चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त : चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर उपाय आहे.लवंगची पावडर फेस पॅकमध्ये किंवा बेसन आणि मधामध्ये मिसळुन हा पॅक चेहऱ्यावर लावावा.त्याने चेहरा स्वच्छ व निर्जंतूक होतो.परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा लवंगाची फक्त पावडर चेहऱ्याला लावू नका.

८) केसगळती पासुन सुटका : ज्यांना केसगळतीचा त्रास आहे आणि ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी लवंगांपासून बनवलेल्या कंडीशनरचा वापर करावा.तसेच लवंग पाण्यात टाकून गरम करावे आणि त्या पाण्याने केस धुवावे.यामुळे केस काळे आणि मजबूत होतात. आपण लवंग तेल खोबरेल तेलात मिसळून त्याने देखील मालिशही करू शकतो.