Home » भोकराच्या फळाचे हे आहेत फायदे, जाणून थक्क व्हाल…
Uncategorized

भोकराच्या फळाचे हे आहेत फायदे, जाणून थक्क व्हाल…

भारतामध्ये अशी अनेक फळे मिळतात ज्यांचे आपल्या आरोग्यासाठी अनेक औषधी गुणधर्म आहेत. भारतामध्ये आयात होणाऱ्या फळां प्रमाणेच काही पर्वतरांगांमध्ये किंवा माळरानावर उगवणाऱ्या झाडापासून मिळणाऱ्या फळांचा सुद्धा वापर औषधी गुणधर्मासाठी केला जातो. यापैकीच एक महत्त्वाचे फळ म्हणजे भोकर होय. भोकर या फळाला लसोडा, निसोरी किंवा गुंद असेसुद्धा म्हटले जाते‌.भोकर या फळाचे आपल्या शरीराला असणारे फायदे जाणून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.भोकर या फळाचा आकार हा एखाद्या सुपारी इतका लहान असतो. भोकराच्या फळाचे सेवन हे लोणचे ,चूर्ण किंवा भाजीच्या रूपात केले जाते. भोकराच्या फळा प्रमाणेच या झाडाची पाने आणि सालींचा सुद्धा औषधी उपयोग केला जातो. भोकराच्या फळाचा उपयोग हा ताप, सर्दी ,खोकला, घशाला सूज येणे यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर अगदी सर्रासपणे फार पूर्वीपासून केला जातो.याच्या केवळ फळाचेच नाही तर संपूर्ण झाडाच्या विभिन्न भागांचे आपल्या शरीरास नक्की काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

  • भोकर या फळाच्या झाडा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. जर आपल्या हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होत असतील किंवा काही मार लागून सूज निर्माण झाली असेल तर अशा ठिकाणी भोकराच्या झाडाची साल काढून त्याचा काढा बनवावा व या काढ्यामध्ये कापूर टाकून या काढ्याने सकाळ-संध्याकाळ ज्या ठिकाणी सूज आली आहे किंवा वेदना होत आहे त्या ठिकाणी मालिश करावी. त्याच प्रमाणे भोकराच्या झाडाच्या सालीची पावडर बनवून त्याचा लेप करून ज्या ठिकाणी वेदना होत आहेत किंवा सूज आली आहे त्या ठिकाणी नियमितपणे लावला असता सुद्धा आराम मिळतो.
  • घशाला आतून सूज आली असेल किंवा घशामध्ये खवखवत असेल तर भोकराचे फळ पाण्यामध्ये उकळून या पाण्याचे सेवन दोन ते तीन वेळा दिवसभरात करावे यामुळे लगेच आराम मिळतो. भोकराच्या फळाप्रमाणे भोकराच्या सालीला सुद्धा पाण्यामध्ये उकळून हे पाणी गाळून प्याले असता आराम पडतो.
  • त्वचेवर खाज निर्माण होणे किंवा खरूज यांसारखे आजार ,व अनृय त्वचाविषयक विकारांवरसुद्धा भोकराच्या बियांचा वापर प्रभावीपणे केला जाऊ शकतो.भोकराच्या फळाच्या बियांना बारीक वाटून त्याचा लेप खाज किंवा त्वचेच्या समस्या निर्माण झाल्या असतील त्या ठिकाणी लावावे व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे हा उपाय केल्याने त्वचे विषयाच्या समस्या दूर होतात.
  • या फळाचा मुख्य फायदा हा शरीराला ताकद मिळवून देण्यासाठी असतो .विशेषतः ज्या पुरुषांना कमजोरी वाटते त्यांनी या फळाचे सेवन अवश्य करावे .कारण भोकर या फळामध्ये शरीराला मजबूत बनवण्यासाठी आवश्यक असलेली कर्बोदके ,प्रथिने ,फायबर ,कॅल्शिअम, लोह या सर्वच घटकांचा पुरेपूर साठा असतो. या फळांना पाच ते सहा इतक्या प्रमाणात दररोज नियमितपणे सेवन करावे. ताज्या भोकराच्या फळां प्रमाणे सुकवलेली फळे सुद्धा तितकीच फायदेशीर ठरतात .या सुकवलेल्या फळांसोबत सुक्या मेव्याला मिसळून त्यापासून लाडू सुद्धा बनवले जाऊ शकतात. तसेच आपल्या रोजच्या जेवणामध्ये भोकराच्या फळांपासून बनवलेल्या भाजीचा सुद्धा समावेश केला जाऊ शकतो.
  • मासिक पाळी दरम्यान काही स्त्रिया व मुलींना केवळ मूड स्विंग्ज नव्हे तर पाय आणि कमरेमध्ये खूप वेदना होतात. यासाठी भोकराचे फळ नियमितपणे सेवन करावे किंवा भोकराच्या सालीचा काढा बनवून पाळीच्या दरम्यान एक ते दोन वेळा दिवसभरातून या काढ्याचे सेवन करावे त्यामुळे वेदना कमी होण्यास साहाय्य मिळते.
  • दातांचे दुखणे हे खूपच वेदनादायी असते .दातांच्या दुखण्यावर सुदधा भोकराच्या फळाचे ताज्या फळाचे किंवा सुकवलेल्या फळाचे नियमित सेवन केले असता आराम मिळतो. तसेच भोकराच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्या असता दातांमध्ये निर्माण झालेली कीड सुद्धा नाहीशी होते.
  • लघवीच्या वेळी जळजळ होणे किंवा योनीमार्ग मध्ये संसर्ग होणे यांसारख्या विकारांवर सुद्धा भोकराचे फळ आणि भोकराच्या सालीचा काढा खूपच गुणकारी ठरतो.