Home » तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरासाठी होणारे विविध फायदे…
Food & Drinks

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरासाठी होणारे विविध फायदे…

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे म्हटले जाते.पुर्वी च्या काळातील लोक पाणी साठवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करत होते.तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने हृदय तंदुरुस्त राहते.कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहते.आर्थराइटिस ची समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

आयुर्वेदानुसार तांबे जीवाणू आणि व्हायरस नष्ट करून पाणी शुद्ध करते.प्राचीन काळात जीवाणू आणि व्हायरस नष्ट करण्यासाठी नदी,तलाव आणि विहीर यामध्ये तांब्याची नाणी टाकत असत.

अमेरिकाच्या संशोधनानुसार कॅन्सर ची सुरुवात रोखण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरते यामध्ये कॅन्सर ला विरोध करणारे घटक असतात.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.उन्हाळ्याच्या दिवसात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.तसेच. पचन चांगले होते.कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे… 

१) पोटाचे विकार दूर होतात : पोटाच्या संबंधित कोणतेही विकार झाल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.पोटदुखी,गॅस,ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता या संबंधित असणारे सर्व आजार दूर होतात तसेच यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.

२) सांधिवातासाठी फायदेशीर : तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.त्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते.तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे शरीरातील युरिक ऍसिड कमी होते.त्याबरोबर हाड मजबुतीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने फायदा होतो.

३) त्वचेचे विकार दूर होतात : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचा संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात.नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि सुरकुत्या पडणे यापासून आराम मिळतो.त्यामुळे सौंदर्य टिकण्यास मदत होते.तसेच त्वचेवरील पेशींच्या निर्मितीसाठी तांबे प्रमुख भूमिका बजावते.त्यामुळे रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचा आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

४) वजन नियंत्रणात ठेवते : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.तांब्याच्या भांड्यातील पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल व अ‍ॅन्टीवायरल असल्याने जखम भरण्यास मदत होते.वजन कमी होत नसेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी नक्की पिऊन बघा.

५) वात, पित्त दुर करते : वात,पित्त आणि कफ या सारख्या समस्या असतील तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.तांब्याच्या भांड्यातील पाणी मेंदूला उत्तेजित आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करते.हे पाणी पिल्याने मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्ती बळकट होते.

६) मुत्रपिंड आणि यकृत निरोगी राहते : तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीराच्या आंतरिक शुध्दी साठी प्रभावी आहे.तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने मूत्रपिंड आणि यकृत निरोगी राहते.तसेच तांबे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते आणि रक्तपुरवठा सुरळीत राहतो.

७) थायरॉईड संबंधित समस्या वर उपाय : नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर थायरॉईड संबंधी असणारे आजार टळतात तसेच स्थुलपणा कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.अशक्तपणा असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर ठरते.