Home » उत्तम आरोग्यासाठी मासे खाणं आहे अत्यंत फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क…!
Food & Drinks

उत्तम आरोग्यासाठी मासे खाणं आहे अत्यंत फायदेशीर, फायदे जाणून व्हाल थक्क…!

मनुष्यासाठी पोषक मानल्या जाणाऱ्या आहारा मध्ये मासे हा अतिशय पौष्टिक आहार मानला जातो. आठवड्यात किमान एकदा मासे खाल्ल्यास नऊ ते अकरा या वयोगटातील मुलांना झोप चांगली येते आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरसुद्धा याचा सकारात्मक प्रभाव पडतो असे दावे केले जातात.

मासे हे प्रथिने, क्षार आणि ओमेगा थ्री फँटी अँसिड ने परिपूर्ण असतात त्यामुळे त्यांचे शरीराला निश्चितच अनेक फायदे आहेत मात्र नियमित मासे सेवन केल्याने बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का याबद्दल अजून फारसे संशोधन झालेले नाही. मासे सेवन केल्याने शरीराला नक्की काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

१) माशांमध्ये असलेल्या omega-3 फेट्टी अॅसिडस मुळे लहान मुलांना चांगली झोप लागते व त्यांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते. माश्यांमधील omega-3 फेट्टी अॅसिडस मुळे नऊ ते अकरा या वयोगटातील मुले  पुरेशी झोप घेऊ  शकतात आणि मध्ये मध्ये उठण्याची समस्या निर्माण होताना दिसत नाही.पुरेशा झोपेच्या आभावी लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी असणे, काही  उदाहरणांमध्ये समाजविघातक कृत्य घडणे असे सुद्धा दिसून येते. त्यामुळे माशांच्या सेवनामुळे लहान मुलांना झोप निश्चितच चांगली येते हे सिद्ध झाले आहे.

२) माश्यांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फँटी अँसिड मुळे हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालते कारण माशांमधील omega-3 फेट्टी अॅसिडस मध्ये सँच्यु रेटेड फँट्सचे प्रमाण खूप कमी असते यामुळे अनियमित पडणारे हृदयाचे ठोके सुरळीतपणे पडू लागतात. बँड कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते आणि रक्त दाब सुद्धा कमी होतो.

३) माश्यांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फँटी अँसिड डीएचएमुळे डोळे आणि मेंदूशी निगडित कार्यांचा विकास होतो.

४) माशांचे नियमितपणे सेवन केले तर स्मरणशक्ती चांगली होते असे मानले जाते. वय वाढते तसे ज्येष्ठांमध्ये स्मृती आणि स्मरणशक्ती काहीशी कमी होत जाते. मात्र जे लोक नियमितपणे माशांचे सेवन करतात त्यांच्या वयानुसार स्मृती भंश होण्याचे प्रमाण कमी दिसून येते.

५) नैराश्य किंवा डिप्रेशन हे सध्याच्या काळातील खूप मोठी आरोग्यविषयक समस्या बनली आहे. डिप्रेशनमध्ये ऊर्जेचा अभाव, कोणत्याही गोष्टीत रस नसणे, थकवा वाटणे ही लक्षणे दिसू लागतात.माशांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिडमुळे अनेक आरोग्य विषयक  समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो.

६) माशांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन डी असते. विटामिन डी हे शरीरातील हाडांचे आणि मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी खूप आवश्यक असते.

७) लहान मुलांमधील टाईप  वन मधुमेह आणि मोठ्या माणसांमधील मधुमेहाचे प्रमाण माशांचे सेवन  केल्यामुळे कमी करता येते. माश्या मध्ये असलेले विटामिन डी आणि आणि ओमेगा थ्री  फँटी आसिड यामुळे मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो.

८) सध्याच्या काळा मध्ये इंटरनेट व मोबाईल वरील जास्त काळ व्यतीत करणे, ताणतणाव यामुळे निद्रानाशासारखे त्रास सुरु होतात. यासंबंधीचे अन्य विकार सुद्धा उद्भवतात. माशांच्या सेवनामुळे झोपेशी संबंधित असे विकार दूर होऊन  झोप व्यवस्थित लागते.