Home » उपाशी पोटी ‘लसूण’ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे,या आजारांपासून मिळेल सुटका…
Food & Drinks

उपाशी पोटी ‘लसूण’ खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे,या आजारांपासून मिळेल सुटका…

पदार्थाची आणि भाजीची चव वाढवण्यासाठी फोडणीमध्ये आवर्जून लसणाचा वापर केला जातो.लसणामुळे पदार्थ चविष्ट लागतात.लसूणामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे लसूणाचे सेवन केल्याने आरोग्याला भरपुर फायदे आहेत. लसणामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे बऱ्याच आजारांपासून बचाव करण्यासाठी लसणाची मदत मिळते

आयुर्वेदामध्ये लसनाला औषध म्हणून ओळखले जाते.त्यामुळे आहारामध्ये लसणाचा समावेश करणे फायदेशीर ठरते. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे शरीराला सर्वाधिक लाभ मिळतो.आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कच्चा लसूण खावा यामुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात.लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडेंट,अँटी-बॅक्टेरिअल,अँटी-फंगल आणि अँटी – व्हायरल हे गुणधर्म असतात.

लसनाचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि लसूण हा आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास उपयुक्त ठरतो.आयुर्वेदामध्ये लसनाचा एक उत्तम औषध म्हणून वापर जातो.लसनामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर,एलिसिन,झिंक,सेलेनियन आणि व्हिटॅमिन-ए आणि ई असतात.

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूनाचा आर्वजून वापर केला जाते.वरणाला,भाजीच्या फोडणीमध्ये,चटणीमध्ये लसूनाचा वापर केला जाते.कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी लसनाचा वापर केला जातो.त्याचबरोबर लसणाचे आरोग्यासाठी देखील भरपूर फायदे आहेत.खासकरून पुरूषांना लसूण खाण्याचे अधिक फायदे आहेत.लसणामध्ये प्रथिने ६.२%,चरबी ०.१%,खनिज १%,लोह ०.३%,जीवनसत्त्वे ए,बी,सी,कार्ब २१% या प्रमाणात असते.

चला तर मग लसूण खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात त्याविषयी काही माहिती जाणून घेऊया

१) कोलेस्ट्रॉल : लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.दररोज सकाळी उपाशी पोटी लसुण खाल्ल्याने हृदय निरोगी राहते.शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात अशावेळी लसुण खाणे उपयुक्त ठरते.लसणामध्ये असणाऱ्या अँटी-हायपरलिपिडेमि या गुणधर्मामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

२) मधुमेह : कच्चा लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.लसूणमध्ये असणाऱ्या अँटी-डायबेटीक गुणधर्मामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.१० ते १५ दिवस लसनाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने रक्तामधील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

३) पोटासंबंधित विकारापासून बचाव : लसूण सेवन केल्याने पोटासंबंधित असणाऱ्या समस्या दूर होतात आणि तसेच आतड्यांसाठी देखील लसुण खाणे उपयुक्त ठरते.लसणामध्ये असणारऱ्या अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे हानिकारक बॅक्टरीया पासुन संरक्षण होते.

४) हाडांच्या मजबुतीसाठी : नियमितपणे लसुण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.लसणामुळे शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो.त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस यासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी संभवतो.त्याचबरोबर लसनामध्ये असणाऱ्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाही.दम्मा असणाऱ्या रुग्णांना लसूण खाणे फायदेशीर ठरते.

५) रक्तदाब आणि अल्झायमर समस्या : लसुण खाल्ल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते.ज्या लोकांना उच्च रक्तदाबासंबंधित समस्या आहे.त्यांच्यासाठी लसुण खाणे खूप फायदेशीर आहे.अल्झायमर या आजारामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते.अल्झायमर हा आजार बहुतेक वेळेस उतरत्या वयामध्ये होतो.लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे हा रोग रोखण्यास मदत मिळते.

६) कर्करोग : लसूणमध्ये अँटी-कर्करोग गुणधर्म असल्यामुळे कर्करोगापासून बचाव होतो.लसणाच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका कमी संभवतो.म्हणून नियमित आहारामध्ये लसनाचा समावेश करावा यामुळे कर्करोग टाळता येऊ शकतो.

७) सर्दी-खोकला आणि ताप : लसूणमध्ये भरपुर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.लसणाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला आणि तापापासून संरक्षण मिळते.त्यामुळे नियमितपणे सकाळी उपाशी पोटी कच्चा लसूण खाल्ला पाहिजे.सर्दी-खोकला आणि तापाचा त्रास असल्यावर आई किंवा आजी घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देत असते.लसनामध्ये अ‍ॅलिसिन नावाचे कम्पाउंड असते.यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या दूर होतात.

८) सुरकुत्या आणि स्ट्रेच पासून अराम : खुप जणांच्या चेहऱ्यावर खूप कमी वयात सुरकुत्या येतात. अवेळी खाण्याच्या सवयीमुळे,सूर्य किरणांमुळे किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे हा त्रास जाणवु शकतो.परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये लसूणचा समावेश असल्यास सुरकुत्यांपासून सुटका होऊ शकते.डिलिव्हरीनंतर किंवा वाढत्या वयोमानानुसार महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात यापासून सुटका हवी असल्यास लसुण फायदेशीर ठरतो.

९) सेक्स हार्मोनसाठी फायदेमंद : लसणामध्ये असणाऱ्या एलिसिन पदार्थामुळे पुरूषांना सेक्स हार्मोनचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत मिळते.त्यामुळे पुरूषांमध्ये असणारे इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर होते.तसेच लसणामध्ये सेलेनियम आणि भरपूर प्रमाणात व्हिटामीन असतात.त्यामुळे स्पर्म क्वालिटी वाढण्यात मदत होते