Home » जाणुन घ्या काळी द्राक्ष खाण्याचे 10 फायदे,वाचाल तर दररोज खाल…
Food & Drinks

जाणुन घ्या काळी द्राक्ष खाण्याचे 10 फायदे,वाचाल तर दररोज खाल…

द्राक्ष ही दोन प्रकारची असतात हिरवी आणि काळी द्राक्ष.यामध्ये काळी द्राक्ष ही काळसर जांभळ्या रंगाची असतात.ही द्राक्षे चवीला गोड असतात.महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात या द्राक्षाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते.द्राक्ष खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.याशिवाय यापासून आइसक्रीम,ज्यूस,सलाड,जॅम बनवतात.तसेच द्राक्षापासून वाईन देखील तयार केली जाते.तसेच द्राक्ष खाण्याचे आणखी बरेचसे फायदे आहेत तर आज आपण द्राक्षाचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत…

१) डायबिटीस,ब्लड प्रेशरवर नियंत्रणात राहते  : काळी द्राक्ष नियमितपाने खाल्यास डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहते.काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल  या नावाचा घटक असतो,ज्यामुळे रक्तामधील इन्सुलिन वाढन्यास मदत होते शरिरातील रक्त वाढायलाही मदत होते,त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. 

२) एकाग्रता वाढते : काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत होते.तसेच ज्यांना मायग्रेनसारखा आजार असेल त्यांनी हि द्राक्ष खावी यामुळे हा आजार बरा होतो.

३) हार्ट अटॅकचा धोका कमी : काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असल्यामुळे आपले हृदय स्वस्थ राहते.त्याबरोबरच ही द्राक्ष खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि यामुळे हार्ट अटॅक च धोका कमी संभवतो. 

४) वजन कमी होते :दररोज नियमितपणे काळी द्राक्ष खाल्लीतर वजन कमी होण्यास मदत होते.यामध्ये असणारा एँटीऑक्साईड मुळे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असणारे टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत मिळते.ज्यामुळे वजन कमी होन्यास मदत होते.

५) अस्थमा  : काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे आपल्या  शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात ज्यामुळे आपल्या शरीरात होत नाही.पोलिओ विरुद्ध लढण्यासाठी देखील काळी द्राक्ष अत्यंत उपायकारक आहे.काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे अस्थमा कमी होण्यास मदत होते. 

६) कॅन्सर : काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट,लंग,प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोका कमी संभवतो त्यामुळे नियमितपणे काळी द्राक्ष खाल्ली पाहिजे. 

७) अपचन होत नाही : काळ्या द्राक्षांमध्ये शुगर,ऑरगॅनिक ऍसिड हे घटक  जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही आणि पचनास मदत होते 

८) डोळ्यांसाठी उपयुक्त : डोळ्याची दृष्टी कमी असेल तर ती वाढवण्यासाठी देखील काळी द्राक्ष अत्यंत फायदेशीर आहे. 

९)  सुरकुत्या होतात कमी : काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे डोळ्याखाली पडलेले काळे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या देखील कमी होतात त्यामुळे काळी द्राक्ष खाल्ली पाहिजे.

१०) केस गळती पासून सुटका  :काळ्या द्राक्ष मध्ये व्हिटॅमिन-इ जास्त प्रमाणात असते त्यामुळे केस गळती आणि केस  पांढरे होणे या सारख्या समस्या दूर होतात.काली द्राक्ष खाल्ल्यामुळे रक्त केसांच्या मुळापर्यंत पोहचण्यास मदत मिळते त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.