Home » उन्हाळ्यात भेंडी खाण्याचे हे आहेत ‘४’ आरोग्यवर्धक फायदे…!
Uncategorized

उन्हाळ्यात भेंडी खाण्याचे हे आहेत ‘४’ आरोग्यवर्धक फायदे…!

उन्हाळा सुरु झाला की  बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भेंडीची भाजी उपलब्ध होते.भेंडीची भाजी अनेकांची आवडती भाजी असते.भेंडीची भाजी चवीला उत्कृष्ट असते पण त्याबरोबरच त्याचे अनेक पौष्टिक फायदेसुद्धा असतात.भेंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात.

भेंडी मध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व क, कॅल्शियम, फायबर ,मॅग्नेशियम असते.भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते .ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना भेंडीची भाजी खाण्याचा सल्ला अवश्य दिला जातो आज आपण भेंडी खाण्याचे शरीराला होणारे अन्य फायदे जाणून घेणार आहोत.

१) मधुमेह असलेल्या व्यक्तींना भेंडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले घटक भेंडीमध्ये असतात.भेंडीतील हे घटक रक्तातील ग्लुकोज  ची पातळी नियंत्रित करतात.

२) हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा भेंडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. भेंडी मध्ये पेक्टिन नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल निर्माण होण्यासाठी प्रतिकार होतो.

३) भेंडी मध्ये क जीवनसत्व असते.क जीवनसत्त्व चे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

४) वजन कमी करणे भेंडी साहाय्य करते असे मानले जाते.