Home » कांद्याची पात खाण्याचे आरोग्यासाठी होणारे अनेक फायदे…
Uncategorized

कांद्याची पात खाण्याचे आरोग्यासाठी होणारे अनेक फायदे…

कांद्याची पात सर्वांनाच माहीत असेल? कांद्याची पात सर्वांनाच खायला आवडते असे नाही.विशेषतः चायनीज पदार्थामध्ये कांद्याच्या पातीचा जास्त उपयोग करण्यात येतो. कांदा खाण्याचे फायदे तुम्हाला माहीतच असेल ? परंतु त्याच बरोबर कांद्याची पात खाण्याचे देखील बरेच फायदे आहेत. आपण कांद्याच्या पातीची भाजी करून देखील खाऊ शकतो.पातीमध्ये भरपूर पोषक घटक असतात.

कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी कांद्याची पात अत्यंत उपयुक्त ठरते.भूक वाढण्यासाठी देखील कांद्याच्या पातीचा उपयोग केला जाऊ शकतो.कारण कांद्याची पात खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील कांद्याच्या पातीचा उपयोग होतो.

कांद्याची पात आपण दोन्ही प्रकारे खाऊ शकतो कच्ची किंवा शिजवून.हिवाळ्यात कांद्याची पात खाण्याचे भरपूर फायदे आहेत.कांद्याची पात सल्फरचा एक उत्तम स्रोत आहे.शरीर निरोगी ठेवण्यासाठी कांद्याची पात खुप फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईडसारखे घटक कॅन्सर पासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात.

चला तर मग जाणून घेऊया कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी असणारे वेगवेगळे फायदे…

१) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी : ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या असते त्यांनी कांद्याची पात खावी उपयोगी ठरते.कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची पात जेवणामध्ये समावेश करावा.कांद्याच्या पातीला असणाऱ्या कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.आणि तसेच यामध्ये असणाऱ्या क्रोमियम घटकामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२) रोगप्रतिकारशक्ती वाढते : कांद्याची पात ही रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.हिवाळा लागला की हिवाळ्यात सगळ्यांचीच प्रतिकारशक्ती कमी होत असते.त्यामुळेच प्रत्येकाला सर्दी-खोकला यासारखे आजार होतात.परंतु कांद्याची पातीचा जर दररोजच्या आहारामध्ये समावेश असेल तर प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण आजारापासून दूर राहातात.

३) कॅन्सरपासून बचाव : कांद्याच्या पातीमध्ये सल्फर भरपुर प्रमाणात असते.यामध्ये असणारे एलिल सल्फाईड आणि फ्लेवोनॉईड सारखे घटक कॅन्सर पासुन दुर ठेवण्यास मदत करतात.आता मात्र कॅन्सर सारखा आजार खुप जणांमध्ये दिसुन येत आहे.परंतु यापासून दूर राहायचे असेल तर  नियमित जेवणामध्ये काद्याच्या पातीचा समावेश करून घ्यायला हवा.

५) रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी : कांद्याच्या पातीमध्ये असणारे सल्फर इथे मुख्य भूमिका पार पाडते.कांद्याच्या पातीमध्ये सल्फर भरपुर प्रमाणात असल्यामुळे रक्तामध्ये इन्शुलिनचे प्रमाण वाढते.त्यामुळे साखर असणाऱ्या रुग्णांनी डाएटमध्ये कांद्याच्या पातीचा समावेश करायला पाहिजे.नियमित कांद्याची पात खाल्ल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

६) पचनशक्ती वाढते : कांद्याच्या पातीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते.त्यामुळे या पातीची भाजी किंवा सलाड खाल्ल्यामुळे पोट साफ राहते आणि आतडेही निरोगी राहतात.दिवसातून एकदा जेवणात पातीचा समावेश केल्याने पोट भरल्यासारखे राहते तसेच शरीराला आवश्यक कॅलरी देखील मिळते.यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि जास्त भूक देखील लागत नाही.

८) सर्दी आणि ताप रोखण्यास फायदेशीर : अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटीव्हायरल गुणांनी उपयुक्त असलेल्या कांद्याच्या पातीमध्ये ताप आणि सर्दीशी लढण्याची क्षमता असते.त्यामुळे सर्दी-खोकला असल्यास कांद्याच्या पातीचे सूप करून घ्यावे.

९) डोळ्यांच्या आरोग्यासाठी : कांद्याच्या पातीत असलेले ल्युटेन आणि व्हिटॅमिन-ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते.म्हणून लहानपणा आपल्या आहारामध्ये कांद्याची पात असली पाहिजे.यामुळे डोळ्याचे आरोग्य निरोगी राहते.

१०) हाडांच्या मजबुतीसाठी: कांद्याच्या पातीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे हाडांच्या मजबुतीसाठी कांद्याची पात अत्यंत गुणकारी आहे.आजकालच्या काळात खुप जणांना हाडे कमजोर होण्याची समस्या आहे अशावेळी कांद्याची पात खाल्याने हाडे मजबूत होण्यासाठी फायदा मिळतो.

११) चेहऱ्यांवरील सुरकुत्यांपासून आराम : जास्त वय झाले तरी देखील प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा हा तरुण आणि सुंदर दिसावा.काही जणांना खुप कमी वयात चेहऱ्यावर सूरकत्या पडतात.अशावेळी कांद्याच्या पातीचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.