Home » कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे,जाणून घ्या…
Food & Drinks

कच्ची केळी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे,जाणून घ्या…

फळे ही शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा पुरवठा करणारा स्त्रोत मानले जातात.अशी सुद्धा काही फळे आहेत जी पिकलेल्या आणि कच्चा अशा दोन्ही स्वरूपा मध्ये खाल्ली असता शरीराला ऊर्जेचा खूप मोठ्या प्रमाणात पुरवठा तर होतोच पण त्याच बरोबरीने शरीराला समृद्ध अशी पोषक द्रव्य सुद्धा पुरवली जातात.कच्च्या आणि पिकलेल्या अशा दोन्ही स्वरूपात खाल्ली जाऊ शकणारी खूप कमी फळे अस्तित्वात आहेत.

त्यापैकी केळी हे फळ तमाम जगभरात खवय्यांच्या पसंतीस उतरलेले फळ आहे ते सेवन केले असता होणाऱ्या फायद्यांमुळे होय.संपूर्ण जगभरामध्ये केळ्याचे सेवन केले जाते. भारतामध्ये कच्च्या केळ्याचे सुद्धा अनेक प्रकाराने सेवन केले जाते.भारतामध्ये कच्च्या केळ्यापासून उकळणे ,तळणे किंवा अन्य प्रकारांनी सेवन केले जाते.केरळमध्ये व महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये कच्च्या केळ्यापासून वेफर्स बनवले जातात.कच्च्या केळ्याचे सेवन केले असता मलविसर्जनाच्या प्रक्रियेत साहाय्य मिळते.

कच्च्या केळ्याचे सेवन केल्यास मिळणारे अजून काही फायदे आहेत तर आज आपण  जाणून घेणार आहोत

१) कच्चे केळे हे तंतू जन्य पदार्थ किंवा फायबर चा प्रमुख स्त्रोत मानले जाते. कच्च्या केळ्याचे सेवन केले असता हृदयाचे आरोग्य निरोगी राखले जाते तसेच फायबर युक्त पदार्थ हे पचनाशी निगडित समस्यांवर सुद्धा उपायकारक ठरते. केळ्यामध्ये तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात .साधारण शंभर ग्रॅम वजनाच्या कच्च्या केळीमधून 2.6 ग्रॅम इतक्या कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात. केळ्यामध्ये असलेल्या फायबर मुळे पचनाची प्रक्रिया सुरळीत चालते. मल विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये त्रास होत नाही .अपचनाची समस्या सुद्धा दूर होते. मलविसर्जनाची प्रक्रिया नियमित होण्यास साहाय्य मिळते.कच्च्या केळीमधील फायबर युक्त घटकांमुळे शरीरातील रक्त आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखले जाते. तसेच अतिरिक्त कोलेस्टेरॉलच्या निर्मितीस प्रतिबंध केला जातो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्यापासूनही बचाव मिळतो.

२) पिकलेल्या केळ्या प्रमाणेच कच्चा केळीमध्ये सुद्धा पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असते. साधारण एक कप उकडलेल्या कच्चा केळ्यामध्ये 531 मिलीग्राम इतके पोटॅशियम भरलेले असते. पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे किडनीचे कार्य प्रभावीपणे चालते आणि रक्तदाबही नियंत्रणात राखला जातो.कच्च्या केळी मध्ये असलेल्या पोटॅशियम च्या मुबलक प्रमाणामुळे कच्च्या केळ्याचे सेवन अवश्य करावे.

 ३) कच्च्या केळ्यामध्ये डायटरी फायबर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते.डायटरी फायबर मुळे आपले पोट भरल्याची भावना निर्माण होते व दीर्घकाळपर्यंत भूक लागत नाही जेणेकरून आपण वारंवार काहीतरी खाण्याच्या प्रवृत्तीला टाळू शकतो.

४) कच्चा केळीमध्ये पोटॅशियम प्रमाणेच जीवनावश्यक जीवनसत्व आणि क्षारांचा समावेश असतो. यामध्ये कॅल्शियम ,जीवनसत्व क आणि जीवनसत्व ब, जीवनसत्त्व बी १२ मोठ्या प्रमाणात असते. कच्च्या केळीमध्ये असलेल्या जीवनसत्त्व आणि क्षार यामुळे अन्य पोषक घटकांचे शरीरामध्ये पचन होण्यास मदत होते.

५) कच्च्या केळीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते.कच्च्या केळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स चे प्रमाण कमी असते व ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेल्या पदार्थांचे सेवन मधुमेह असलेल्या व्यक्तीने केले असता त्यांच्या चयापचयाची प्रक्रियाही सुलभ होते व साखरेचे प्रमाणही शरीरामध्ये वाढत नाही‌.कच्चा केळ्यामध्ये रेजिस्टन्स स्टार्च असते. रेजिस्टन्स स्टार्च मुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल संचयास प्रतिबंध केला जातो. त्याच प्रमाणे कच्चा केळी मध्ये असलेल्या मुबलक फायबर मुळे चांगले कोलेस्टेरॉल  तयार होण्यासही चालना मिळते.अमिनो ऍसिडमुळे हृदय विकारांपासून संरक्षण मिळते.

६) पचनास त्रास होत असेल किंवा मलविसर्जनाच्या प्रक्रियेवेळी पोटात कळ येत असेल तर अशावेळी उकडलेल्या कच्च्या केळ्याचे सेवन केले असता या समस्या दूर होतात.उकडलेल्या कच्च्या केळ्याचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे कारण तळलेल्या कच्च्या केळ्यामधून शरीरात अतिरिक्त कॅलरीज जातात.

७) शरीरातील आतड्यांचे कार्य निरोगी राखण्यासाठी सुद्धा कच्च्या केळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कच्च्या केळीमुळे आतड्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या चांगल्या बॅक्टेरिया यांच्या वाढीस चालना मिळते. या चांगल्या बॅक्टेरिया यांच्या वाढीमुळे शरीरातील पचन संस्था आणि पोट व आतडे हे शुद्ध आणि निरोगी राखले जातात.

८) कच्चे केळे हे जीवनसत्व आणि क्षारांचा प्रमुख स्रोत असतात.कच्चा केळी मध्ये असलेल्या जीवनसत्व क मुळे शरीरातील त्वचा आणि केस यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. जीवनसत्व क मुळे शरीरातील पेशींना होणारी हानी सुद्धा रोखली जाते.जीवनसत्व क मुळे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते . कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या जीवनसत्व ब सिक्स मुळे शरीराला मिळणारी ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित केली जाते. जीवनसत्व ब सहा हे हृदयाचे आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावते .जीवनसत्व ब 6 मुळे शरीरातील हिमोग्लोबिन च्या वाढीस सुद्धा चालना मिळते.