Home » दुर्मिळ होत चाललेले हे फळ आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर…
Uncategorized

दुर्मिळ होत चाललेले हे फळ आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर…

आपल्या देशात अशा अनेक वनस्पती आहे ज्यांच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांचा औषधी बनवण्यासाठी वापर केला जातो.परंतु दिवसेंदिवस केमिकलयुक्त औषधांमुळे नैसर्गिक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीकडे दुर्लक्ष्य होत आहे.नवीन पिढीमध्ये याचा विसर पडत चालला आहे त्यांना फळाचे फायदे माहीत होणे गरजेचे आहे.तर या औषधी वनस्पतींचे काय फायदे आहेत.तर आज पण अशाच एका वनस्पती विषयी माहिती बघणार आहोत ती म्हणजे कवठ.

कवठ हे फळ खुप कमी जणांना माहीत असेल.बाहेरून कठीण आणि टणक आवरण असलेले चवीला आंबट-गोड असणारे हे फळ ग्रामीण भागातील लोकांना माहीत असेल आणि त्यांनी खाल्लेले देखील असेल.कारण शेतीच्या बांधावर ही झाडे जास्त प्रमाणात दिसुन येतात.

कवठ या फळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.कवठ या फळाला संस्कृतमध्ये दधिफल आणि कपित्थ या नावाने ओळखले जाते तर यालाच इंग्लिशमध्ये ‘वुड अ‍ॅपल’ असे म्हणतात.शहरी भागातील लोकांनी या फळाचा आस्वाद कमी प्रमाणात घेतला असेल.बाजारात हे फळ आले की त्यांना ते खायला भेटते.परंतु गावाकडील लोकांना जास्त प्रमाणात हे फळ खायला भेटते.कवठमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

शिवरात्रीच्या दिवशी उपवास असतांना देखील हे फळ खाल्ले जाते.कवठाच्या मध्ये असणाऱ्या गराचा आपण चटणी,मुरंबा आणि जॅम बनवण्यासाठी वापर करू शकतो.काहीजण तर या गरामध्ये गूळ टाकून खायला खुप आवडते गुळ टाकुन खाल्ल्यावर याची चव खूप चविष्ट लागते.

तर मित्रांनो आज आपण कवठ खाल्याने आपल्या आरोग्याला होणारे फायदे बघणार आहोत…

१) भुक वाढवण्यासाठी फायदेशीर : काही लोकांना भुक कमी लागते जेवतांना हे लोक कमी जेवतात त्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहत नाही कमजोर राहते.अशावेळी कवठ खाल्ले तर पचनक्रिया सुरळीत होते आणि त्याचबरोबर भुक देखील लागते.ज्यांना कमी भुक लागते त्यांनी कवठाचे सेवन केले पाहिजे.

२) रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी : रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे ही समस्या भरपूर लोकांमध्ये असते.तसेच कोलेस्ट्रॉल वाढणे या समस्या असतील तर यावर उपाय म्हणून कवठ खावे याने रक्तदाब नियंत्रणात राहील आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास देखील मदत होईल.

३) पचन संस्थेसाठी उपयुक्त : कवठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध असते यामुळे कवठ खाल्ल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते.अपचनाचा त्रास असेल तर कवठाचे सेवन करावे.पोटासंबंधीत कोणतीही समस्या असेल जसे की मळमळ होणे,उलटी होणे,पित्त असणे किंवा जुलाब यासारख्या समस्या असेल तर कवठ यावर एक रामबाण उपाय आहे.

४) प्रोटीनयुक्त : कवठ या फळामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे याचे सेवन केल्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.त्यामुळे शरीरात प्रोटिन्सची कमतरता असल्यास कवठाचे सेवन करावे.

५) व्हिटॅमिन-सी चा सोर्स : प्रोटीन बरोबर या फळामध्ये व्हिटॅमिन-सी देखील भरपूर प्रमाणात असते.सर्दी-खोकला असल्यावर आपली रोगप्रतिकार शक्ति कमी होते तेव्हा या फळाचे सेवन करावे.यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

६) डोळ्यांसाठी उपयुक्त : कवठ हे फळ बीटा कॅरोटीन चा उत्तम स्रोत आहे.काही जणांची खूप कमी वयात दृष्टी कमी होते त्यामुळे त्यांना चष्म्या किंवा लेंन्सेस चा वापर करावा लागतो.अशावेळी कवठ खाणे फायदेशीर ठरू शकते.यामध्ये बीटा-कॅरोटीन असते त्यामुळे नजर तिक्ष्ण होते.