Home » जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुमच्यासाठी काही किचन टीप्स नक्कीच उपयोगी पडतील…
Food & Drinks

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर तुमच्यासाठी काही किचन टीप्स नक्कीच उपयोगी पडतील…

आपण नेहमी विचार करतो की आपल्याला स्वयंपाकासाठी वेगवेगळ्या टिप्स व नवनवीन डिशेशची माहिती मिळावी तर आज आपण स्वयंपाक करतांना वापरायच्या काही खास टिप्स ज्यांचा तूम्ही तुमच्या किचन मध्ये वापर करू शकता.

ज्या कामाला उशीर लागतो ती कामे लवकरात लवकर कशी करावी जेणेकरून आपला वेळ वाचेल कामे लवकर होतील चला तर मग जाणुन घेऊया किचन मधील काही सोप्या टिप्स…

१) टोमॅटोचे पल्प काढण्यासाठी टोमॅटो कुकरमध्ये मीठ टाकून पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल लवकर काढता येते. याचा उपयोग टोमॅटो सूप,ज्युस आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी होतो.

२) उन्हाळयात लिंबू सरबत आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते.त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होवुन वाळते.त्यासाठी लिंबूना निट धूवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावून ठेवल्यास आणि फ्रिजमध्ये ठेवल्यावर देखील बरेच दिवस लिंबू ताजे राहतात.

३) जर भाजीमध्ये कमी मीठ पडले तर वरून टाकता येते परंतु जर भाजीमध्ये मीठ जास्त पडले तर प्रश्नच निर्माण होतो.जर रस्स्याची भाजी असेल तर त्यामध्ये उकडलेले बटाटा टाकावी किंवा कणकेचा गोळा टाकावा.यामुळे जास्त झालेले मीठ शोषले जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही.पण थोड्यावेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढुन घ्यावा.जर सुक्या भाजीत असेल मीठ जास्त पडले असेल तर त्यात थोडेसे भाजलेले बेसन किंवा दाण्याचा कूट टाकू शकता.

४) जर भाजीमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नसेल तर लसूण खुडून टाकण्याऐवजी कूटून किंवा किसून टाकावा. असे केल्यास भाजीमध्ये लसणाचा वास येतो.

५) कित्येकदा लोक चहा झाल्यावर त्यामधील पत्ती फेकून देतात.पण असे न करता उरलेली पत्तीचा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापर करु शकता किंवा झाडाला खत म्हणूनही टाकु शकता.चहाच्या पत्तीने काचेच्या आणि लाकडाच्या वस्तू देखील स्वच्छ करू शकता.

६) जेव्हा आपण कोशिंबीर बनवून ठेवतो तेव्हा काही वेळा ती आंबट होते.यासाठी दह्यांमध्ये आधीच सर्व साहित्य घालावे परंतु मीठ घालू नये.कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घालावे म्हणजे कोशिंबीर आंबट होत नाही.

७) बटाट्याचा पराठा लाटताना त्यामधील सारण बाहेर आल्यामुळे पराठा फुटतो.असे होऊ नये यासाठी पराठ्याची पीठ भिजवताना त्यामध्ये तेल घालावे यामुळे पीठ मऊ होते यामुळे पराठा फुटत नाही आणि सारणही बाहेर येत नाही.

८) अंडी उकडताना फुटत असेल तर अंडी उकडायला टाकताना पाण्यात थोडेसे मीठ घालावे आणि नंतर अंडी उकडुन घ्यावी मग अंडी छान उकडतील आणि फुटणार नाही.

९) ईडली मऊ होण्यासाठी आणि फुगण्यासाठी ईडलीच्या पीठात थोडे उकडलेले तांदूळ टाकावे किंवा ईनो आणि बेकींग सोडा टाकावा.असे केल्याने ईडली मऊ होतील आणि फुगतील देखील.

१०) खूप महिलांच्या तक्रारी असतात की भात शिजल्यावर मोकळा होत नाही.शिजल्यावर भात चिकट होतो.जर तुम्हाला मोकळा भात करायचा असेल तर बिना झाकणाच्या भांड्यात शिजवावा किंवा भात लावताना त्यात लिंबू पिळावे किंवा त्तूप घालावे यामुळे भात मोकळा होतो आणि चिकटही होत नाही.

११) चहा करताना आदरक चहा उकळल्यावर टाकावा चहाचा स्वाद आधिक वाढतो.

१२) भाड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावे आणि नंतर स्वच्छ धुवून काढावे वास येणार नाही.

१३) भाज्या आणि कडधान्य वाफाळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नये.त्यामध्ये व्हिटॅमिन-बी मोठ्याप्रमाणात प्रमाणात असते त्यामुळे हे फेकू न देता.हे पाणी भाजीत किंवा पीठ भिजवताना वापरावे.

१४) भरीतासाठी वांगी लवकर भाजली जावी यासाठी वांग्याला वरतुन थोडेसे गोडतेल लावावे किंवा कट करून भाजावेत. 

१५) ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात बेसन पीठ,तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे.यामुळे लोणी हाताला अजिबात चिकटत नाही.

१६) पावसाळयामध्ये  माशा खुप त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या वड्या टाकाव्यात म्हणजे माशा होत नाही.

१७) घरात किंवा किचनमध्ये मोरपीस ठेवल्यास पाली होत नाही.घराच्या कोपऱ्यात बोरीकर पावडर ठेवल्यास कॉकरोज होत नाही. 

१८) आपण रोज चहा करतो.त्या पातील्याला चहाचे डाग पडतात त्या डागांना मिठ लावून चोळल्यास डाग पटकन निघतात.

१९) साखरेला मुंग्या होणे म्हणजे खुप त्रास दायक.अशावेळी साखरेच्या डब्बयावर लवंग ठेवल्यास मुंग्या होत नाही.

२०) लिंबामधुन पुर्ण रस काढायचा असेल तर ५-१० मिनिटे लिंबु कोमट पाण्यात ठेवावे आणि नंतर रस काढावा रस जास्त निघेल.